लग्नाच्या अनेक वर्षानंतर समजलं मुले त्याची नव्हतीच, निराश पतीने घेतला असा सूड...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 09:48 AM2024-03-20T09:48:00+5:302024-03-20T09:48:34+5:30

चेनला ती एक साधी आणि मेहनती महिला वाटली. चेनने तिला अधिक जाणून घेण्यासाठी वेळही घेतला नाही. लवकर लग्न केलं.

China man divorces wife discovering none three kids are his asked for emotional distress compensation | लग्नाच्या अनेक वर्षानंतर समजलं मुले त्याची नव्हतीच, निराश पतीने घेतला असा सूड...

लग्नाच्या अनेक वर्षानंतर समजलं मुले त्याची नव्हतीच, निराश पतीने घेतला असा सूड...

विवाहित जोडपी किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांच्यातील एकमेकांना दग्या दिल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. अशात दगा मिळालेले लोक निराश होऊन रडत बसतात किंवा ते सूड घेण्याचा विचार करतात. एका व्यक्तीसोबत असंच झालं. लग्नाच्या 16 वर्षानंतर जेव्हा पतीला पत्नीचं सत्य समजलं तेव्हा त्याला धक्का बसला.

डिसेंबर 2017 मध्ये चेन जिक्सियनने आपल्याहून आठ वर्षाने लहान असलेल्या यू हुआ नावाच्या महिलेसोबत लग्न केलं. त्यांनी पहिल्या भेटीनंतर लगेच लग्नाचा निर्णय घेतला. चेनला ती एक साधी आणि मेहनती महिला वाटली. चेनने तिला अधिक जाणून घेण्यासाठी वेळही घेतला नाही. लवकर लग्न केलं. लग्न झाल्यावर काही दिवसातच यू हुआने चेनला सांगितलं की, ती गर्भवती आहे. अर्थातच जे ऐकून चेन आनंदी झाला. 

काही महिन्यांनी यू ने एका मुलीला जन्म दिला. चेन एका दुसऱ्या शहरात ड्रायव्हरचं काम करू लागला. तो वर्षातले जास्तीत जास्त दिवस बाहेरच राहत होता. घरी फार कमी वेळ यायचा. काही वर्षानी यू हुआने आणखी एका मुलीला जन्म दिला. चेनने सुद्धा मान्य केलं की, ती मुलगी त्याची आहे. पण यू हुआने पुन्हा तिसऱ्यांदा ती गर्भवती असल्याचं सांगितलं. अशात आता चेनला तिच्यावर संशय आला.

कारण चेन यू हुआ गर्भवती होण्याआधी घरी आलाच नव्हता. अशात त्याने याबाबत पत्नीसोबत चर्चा केली. पण यू हुआने जोर देऊन सांगितलं की, हे बाळही त्याचंच आहे. चेनने तिचं ऐकलं आणि तिसरीही मुलगी झाली.

पण आता त्याचा संशय आणखी वाढला. कारण नोव्हेंबर 2022 मध्ये त्याला समजलं की, त्याच्या पत्नीचं एका व्यक्तीसोबत अफेअर सुरू होतं आणि तिने एका हॉस्पिटलमध्ये चौथ्या मुलीला जन्म दिला होता. यू हुआला काही बोलण्याऐवजी त्याने एक वकील बोलवला आणि हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे त्याला समजलं की, नोव्हेंबर महिन्यात एका मुलीला तिने जन्म दिला होता. पण रिलीज फॉर्मवर वडील म्हणून त्याचं नाव आणि खोटे हस्ताक्षर होते.

यावरून त्याला पत्नीने दगा दिल्याचं सिद्ध झालं. नंतर चेनने घटस्फोटासाठी अर्ज दिला. आपल्या सगळ्या मुलींची त्याने पॅटरनिटी टेस्ट केली. टेस्टचा रिझल्ट धक्का देणारा होता. कारण तीनपैकी एकही मुलगी त्याची नव्हती. अशात संतापलेल्या चेनने पत्नीला कोर्टात खेचलं. त्याने घटस्फोटासोबत नुकसान भरपाईचीही मागणी केली.

29 डिसेंबर 2023 ला एका फॅमिली कोर्टाने घटस्फोटाच्या केसमध्ये आपला निर्णय दिला. चेनला दोन मोठ्या मुलींची कस्टडी देण्यात आली. तसेच पत्नीला संपत्तीवरील दावा सोडण्यास आणि आपल्या पतीला मासिक भत्ता देण्याचा आदेश देण्यात आला.  

Web Title: China man divorces wife discovering none three kids are his asked for emotional distress compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.