1 वर्षापासून ज्या तरूणीसोबत सुरू होतं ऑनलाइन अफेअर, ती निघाली बेस्ट फ्रेंडची पत्नी; लुटले लाखो रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 01:48 PM2023-04-01T13:48:09+5:302023-04-01T13:48:36+5:30
“दोस्त, दोस्त ना रहा, प्यार-प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा, एतबार ना रहा…”, हे गाण खरं ठरणारी एक घटना चीनमधून समोर आली आहे.
“दोस्त, दोस्त ना रहा, प्यार-प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा, एतबार ना रहा…”, हे गाण खरं ठरणारी एक घटना चीनमधून समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने बेस्ट फ्रेंडच्या पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याचं कारण वाचाल तर हैराण व्हाल.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, चीनच्या हेनान प्रांतात राहणारा ज्हो कलिंगडाचा व्यापार करतो. बऱ्याच वर्षापासून तो लग्न करण्याचं प्लानिंग करत होता. पण त्याला हवी तशी मुलगी मिळत नव्हती. तो म्यानमारमध्ये राहत होता. दुसऱ्या शहरात राहत असून तो त्याचा बेस्ट फ्रेंड जियाओ ली याच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. गेल्यावर्षी त्याने जियाओला सांगितलं होतं की, बिझनेस चांगला सुरू आहे आणि तो आता लग्न करण्यासाठी तयार आहे.
तेव्हा जियाओने त्याला सांगितलं की, त्याच्या पत्नीची एक मैत्रीण आहे जी सिंगर आहे आणि त्याच्यासाठी ती योग्य ठरेल. पत्नीकडे तिच्याबाबत बोलतो असा विश्वास जियाओने त्याला दिला होता. ती तरूणी आणि ज्हो यांच्यात ओळख झाली आणि ते ऑनलाइन रिलेशनशिपमध्ये आले.
बरेच दिवस त्याचं लॉंग डिस्टंस रिलेशनशिप चाललं आणि ज्हो ने ठरवलं की, तो या तरूणीसोबत लग्न करेल. पण अचानक तरूणीचं खरं रूप समोर आलं. तिने एक दिवस फोनवर ज्हो याला सांगितलं की, एका कंस्ट्रक्शन साइटवर तिच्या भावाचा अपघात झाला आणि त्याच्या उपचारासाठी तिला 60 हजार रूपयांची गरज आहे. ज्हो याने तिला लगेच पैसे दिले.
नंतर तरूणीने वडिलांची तब्येत बिघडल्याचं कारण सांगत आणखी काही पैसे त्याच्याकडे मागितले. असे तिने एका वर्षात त्याच्याकडून तब्बल 9 लाखांपेक्षा पैसे घेतले. ज्हो तिच्यावर प्रेम करू लागला होता. त्यामुळे तो तिला पैसे देत गेला. काही दिवसांनी ज्हो याने मित्र जियाओ याला सांगितलं की, ती तरूणी त्याला आवडली आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. तेव्हा जियाओ म्हणाला की, मुळात ती तरूणी आहेच नाही. त्याची पत्नीच त्याच्यासोबत तरूणी म्हणून बोलत होती.
नुकतंच त्याला समजलं की, जियाओची पत्नी त्याला सोडून गेली आहे. हे ऐकून ज्हो संतापला आणि त्याने पोलिसात तक्रार देण्याचं ठरवलं. पण पत्नीची आब्रू वाचवण्यासाठी जियाओने त्याला असं करण्यास रोखलं. म्हणाला की, ती पूर्ण पैसे परत करेल. पण पैसे परत मिळाले नाही तेव्हा त्याने पोलिसात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. आता या घटनेची चौकशी केली जात आहे आणि हेही शोधलं जात आहे की, जियाओ सुद्धा पत्नीसोबत या प्लानमध्ये होता का?