कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन! गर्लफ्रेन्डसोबतचं लग्न टाळण्यासाठी त्याने Nightclub मध्ये केली चोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 04:10 PM2020-01-23T16:10:56+5:302020-01-23T16:16:53+5:30

जगभरातील लोक कन्फ्यूजनमध्येच खूप काही करून जातात. तुम्हीही कधीना कधी कन्फ्यूज झाले असाल. पण एका पठ्ठ्याने कन्फ्यूज होण्याची लिमिटच क्रॉस केलीये.

China man gets arrested deliberate to avoid getting married to his girlfriend | कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन! गर्लफ्रेन्डसोबतचं लग्न टाळण्यासाठी त्याने Nightclub मध्ये केली चोरी!

कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन! गर्लफ्रेन्डसोबतचं लग्न टाळण्यासाठी त्याने Nightclub मध्ये केली चोरी!

Next

जगभरातील लोक कन्फ्यूजनमध्येच खूप काही करून जातात. तुम्हीही कधीना कधी कन्फ्यूज झाले असाल. पण एका पठ्ठ्याने कन्फ्यूज होण्याची लिमिटच क्रॉस केलीये. अनेकजणांना तुम्ही कन्फ्यूजनमधून बाहेर येण्यासाठी काहीही करताना पाहिलं असेल. पण याने जे केलं ते फारच भन्नाट आहे. चेन नावाच्या व्यक्तीचं गर्लफ्रेन्डसोबत लग्न होणार होतं. पण अचानक त्याची ट्यूब पेटली आणि त्याने हे लग्न करावं लागू नये म्हणून एक आयडिया केली. तो एका नाइटक्लबमध्ये चोरी करायल गेला.

इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नाच्या काही दिवसांपूर्वी चेनची भबेरी उडाली. त्याला जाणीव झाली की, त्याचं गर्लफ्रेन्डवर प्रेम नाही. त्याला हे लग्न करायचं नाही. आता हे लग्न टाळण्यासाठी तो आयडिया शोधू लागला. त्याच्या लक्षात आलं की, त्याने जर एखादा गुन्हा केला तर त्याची गर्लफ्रेन्ड त्याच्यासोबत लग्न करणार नाही. मग त्याने केला चोरीचा प्लॅन.

चेन एका नाइटक्लबमध्ये गेला आणि त्याने तेथील एक ब्ल्यूटूथ स्पीकर उचलला. झालं त्याला जे हवं होतं तेच झालं. क्लबवाल्यांनी पोलिसांना बोलवले आणि पोलीस त्याला घेऊन गेले. 

पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याला चोरीचं कारण विचारलं. यावेळी चेनने सांगितले की, 'माझ्या गर्लफ्रेन्डला लग्न करायचं होतं. पण मला करायचं नव्हतं. माझी गर्लफ्रेन्ड एका गुन्हेगाराशी लग्न करणार नाही हे मला माहीत होतं. म्हणून मी ही चोरी केली'.


Web Title: China man gets arrested deliberate to avoid getting married to his girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.