लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 09:45 AM2021-03-13T09:45:17+5:302021-03-13T09:48:31+5:30
महिला पायाच्या जखमेचा एक्स-रे काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती. तेव्हा डॉक्टरला काही अविकसित हाडांबाबत आढळून आलं.
चीनमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे आई होण्याचा प्रयत्न करत असलेल्या महिलेला समजले की, ती महिला नाही तर पुरूष आहे. महिला गेल्या एक वर्षापासून गर्भवती होण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यात तिला यश मिळालं नाही. नुकतीच ती पायाची जखम दाखवण्यासाठी डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला समजलं की, ती महिला नाही तर पुरूष आहे. डॉक्टरने तिला सांगितले की, तिच्या पुरूष Y गुणसूत्र (Male Y Chromosome) आहे. तरी सुद्धा ती आयुष्यभर महिलेच्या रूपात राहू शकते.
म्हणून झाली नाही गर्भवती
२५ वर्षीय विवाहित महिला पायाच्या जखमेचा एक्स-रे काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती. तिथे तिला डॉक्टरने सांगितले की, ती एका दुर्मीळ आजाराने पीडित आहे आणि त्यामुळेच तिला कधी मासिक पाळी आली नाही. तसेच त्यामुळेच ती गर्भवतीही राहू शकली नाही. WION ने दिलेल्या रिपोर्टनुसार, महिलेला हे समजल्यावर तिला धक्का बसला आहे. (हे पण वाचा : हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध!)
46 XY Disorder ने पीडित
डॉक्टरांनुसार, महिला X46 विकार' (46 XY disorder of sexual development) ने पीडित आहे. ही एक अशी अवस्था असते ज्यात पुरूष गुणसूत्र असलेल्या लोकांमध्ये प्रायव्हेट पार्ट अस्पष्ट, अविकसित किंवा नसतातच. पण या महिलेला फीमेल ऑर्गन आहे त्यामुळे तिने कधी याकडे लक्ष दिलं नाही. ती हाच विचार करत राहिली की, एखाद्या अडचणीमुळे तिला मासिक पाळी येत नसेल. आणि ती गर्भवती राहू शकत नसेल. ती म्हणाली की, मासिक पाळी येत नसल्याने तिला त्रास होतो. पण लोक काय म्हणतील म्हणून ती कुणाशी याबाबत बोलली नाही. (हे पण वाचा ; सुंदरा मनामध्ये भरली! लठ्ठपणामुळे बॉयफ्रेंड सोडून गेला, काही महिन्यांनी ती म्हणाली, बघ तू काय गमावलं...)
महिला पायाच्या जखमेचा एक्स-रे काढण्यासाठी डॉक्टरकडे गेली होती. तेव्हा डॉक्टरला काही अविकसित हाडांबाबत आढळून आलं. त्यांनी आणखी व्यवस्थित पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की, पिंगपिंग ही महिला नसून पुरूष आहे. डॉक्टर म्हणाले की, तिला गर्भाशय किंवा अंडाशय नाही. त्यामुळे ती गर्भवती होऊ शकत नाही. डॉक्टरांनुसार, महिलेत कोणताही पुरूष अवयव नाही. पण हे शक्य आहे की आधी असेल आणि काळानुसार तो अवयव नष्ट झाला असेल.
उपचार शक्य
अमेरिकेत आनुवांशिक आणि दुर्मीळ रोग सूचना केंद्राचं मत आहे की, अशी अवस्था असलेल्या अनेक लोकांमध्ये प्रायव्हेट पार्ट असतात. पण त्यांना स्पष्टपणे पुरूषाचे किंवा महिलांचे म्हणता येत नाही. तज्ज्ञ सांगतात की, 46 XY लोकंमध्ये पूर्णपणे अविकसित मादा प्रजनन अवयव असतात. जसे की, गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब. तर काहींमध्ये नसतात. सर्जरी किंवा हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपीच्या माध्यमातून यावर उपचार करता येतात.