लग्न न करता इथे प्रेग्नेंट होतात महिला, शारीरिक संबंधासाठी पुरूषांना बोलवतात; पण लग्न करत नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 11:59 AM2023-05-26T11:59:58+5:302023-05-26T12:07:27+5:30
Jarahatke - या समाजाच्या परंपरा जुन्या आहेत असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. काही जमातीच्या परंपरा अशा आहेत ज्या आजच्या मॉडर्न समाजालाही फेल करतात.
Jarahatke - जगात अनेक प्रकारच्या जमाती राहतात. या लोकांना जगाच्या नजरेपासून दूर राहणं पसंत आहे. एकीकडे शहरात राहणारे लोक विकसित होत आहेत तर हे लोक त्यांच्या जुन्या परंपरा पार पाडण्यात सूख मानतात. पण या समाजाच्या परंपरा जुन्या आहेत असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. काही जमातीच्या परंपरा अशा आहेत ज्या आजच्या मॉडर्न समाजालाही फेल करतात.
आजकाल लिव्ह-इन रिलेशनशिप ही कॉन्सेप्ट फार चलनात आहे. बरेच लोक या विरोधात आवाजही उठवतात. तरीही बरेच कपल लिव्ह-इनमध्ये राहतात. भारतात लग्न हा सोबत राहण्याचा सगळ्यात मोठा क्रायटेरिया आहे. त्यामुळे लिव्ह-इनला अंगिकारण्यात लोकांना वेळ लागतो. पण शहरात हे जास्त होतं.
पण चीनमध्ये एक असा समाज आहे जो आज नाही तर अनेक हजार सालांपासून लिव्ह-इनमध्ये राहतो. या समाजातील महिलांना पुरूषांसोबत राहण्यात इंटरेस्ट नाही. त्या फक्त पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवतात आणि प्रेग्नेंट होतात. त्यानंतर पुरूषांना घरातून काढून देतात.
पुरूषांच्या स्पर्मला महत्व
साउथवेस्ट चीनच्या मोसुआ समाजात अनेक हजार वर्षापासून ही लिव्ह-इनची परंपरा चालत आली आहे. या समाजातील महिलांना लग्नात काहीच इंटरेस्ट नाही. इथे पुरूष ना लग्न करतात ना मुलांना सांभाळण्यात काही मदत करतात. या समाजात लग्न या शब्दाला काहीच जागा नाही. या परंपरेला वॉकिंग मॅरेज म्हटलं जातं. यात पुरूष आणि महिला सोबत राहत नाहीत. फक्त मुलं होण्यासाठी सोबत झोपतात. यानंतर महिला प्रेग्नेंट झाली तर त्या पुरूषाला घराबाहेर काढलं जातं. महिला एकटीच आपल्या मुलाचा सांभाळ करते.
मोसुओ जमातीचे लोक फार स्वतंत्र विचाराचे आहेत. जशीही मुलीला पाळी सुरू होते ते तिला वेगळी रूम देतात. त्यानंतर ती कुणालाही आपल्या रूममध्ये बोलवू शकते. जर या भेटींमध्ये बाळाचा जन्म झाला तर बाळाची देखभाल महिलेला करावी लागते.
वडील बाळाची काही मदत करत नाही. असं अजिबात नाहीये की, वडिलांबाबत या समाजाला काही माहिती नाही. काही खास उत्सव असेल तर वडिलांनाही मुलांना भेटण्यासाठी बोलवलं जातं. यावेळी सगळ्यांना माहीत पडतं की, बाळाचा पिता कोण आहे.