मालकाने बेवारस सोडून दिला होता कुत्रा, लिलावात इतकी रक्कम मिळाली की, वाचून हैराण व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 12:22 PM2021-11-09T12:22:47+5:302021-11-09T12:25:45+5:30
या डॉगीचं नाव डेंग-डेंग आहे आणि हा कुत्रा शिबू इनू ब्रीडचा आहे. ७ वर्षाआधीची गोष्ट आहे जेव्हा या कुत्र्याचा मालक त्याला एका पेट सेंटरवर सोडून गेला होता.
चीनमधील एक कुत्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कारण त्याचा मालक त्याला एका पेट सेंटरमध्ये सोडून गेला होता आणि आता या कुत्र्याचा लिलाव करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा कुत्रा लिलावात तब्बल १८ लाख रूपयांना विकला गेला आहे.
या डॉगीचं नाव डेंग-डेंग आहे आणि हा कुत्रा शिबू इनू ब्रीडचा आहे. ७ वर्षाआधीची गोष्ट आहे जेव्हा या कुत्र्याचा मालक त्याला एका पेट सेंटरवर सोडून गेला होता. त्यानंतर तो त्याला कधीच घेण्यासाठी परत आला नाही. मॅराथन ऑनलाइनमध्ये त्याचा १६०,००० युआन (२५,००० डॉलर) मध्ये लिलाव करण्यात आला. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १८ लाख रूपये होते.
Dog is auctioned for $ 25,000 after 7 years of being abandoned
— KENKENMANDRIQUE (@KENKENKHEMON) November 5, 2021
Abandoned by the former owner at a pet training center since 2014, Deng Deng was lonely for a long time before attracting interest at an auction.#shibapic.twitter.com/Hv1fCGFIKb
या कुत्र्याचा मालक त्याला परत नेण्यासाठी अनेक वर्ष आला नाही. मग कोर्टाने या कुत्र्याला निलाम करण्याची परवानगी दिली. या कुत्र्यावर बोली लावण्यासाठी ४८० लोक आले होते. २०१८ मध्ये जेव्हा या कुत्र्याचा मालक त्याला सोडून गेला होता. तेव्हा त्याची कहाणी चीनमध्ये व्हायरल झाली होती. या कुत्र्याच्या मालकाने पेट सेंटरला फी सुद्धा दिली नव्हती. आता या कुत्र्याचा लिलाव करून १८ लाख रूपये मिळाले आहेत.