VIDEO : लागोपाठ 12 दिवसांपासून एका सर्कलमध्ये फिरत आहेत मेंढ्या, वैज्ञानिकही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 10:29 AM2022-11-19T10:29:02+5:302022-11-19T10:30:11+5:30
Sheep Walking In Circle For Twelve Days: हा व्हिडीओ शेअर करून दोन दिवस झाले आहेत आणि अजूनही मेंढ्या तशाच चालत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मेंढ्या ज्या लोकांनी पाळल्या आहेत ते स्वत: हैराण झाले आहेत.
Sheep Walking In Circle For Twelve Days: जेव्हा आपण कधी टीव्ही किंवा रिअॅलिटी शोमध्ये मेंढ्यांना बाबतच्या गोष्टी आठवू लागतात. असं सांगितलं जातं की, मेंढ्या सरळ एका रेषेत चालतात आणि आपल्या समोर चालत असलेल्या मेंढ्यांना फॉलो करतात. पण नुकतीच चीनमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. ज्यात साधारण 12 दिवसांपासून मेंढ्या गोलगोल फिरत आहेत.
काय आहे याचं रहस्य
हा व्हिडीओ पीपल्स डेली चायनाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, मेंढ्यांचं मोठं रहस्य, उत्तर चीनमध्ये मंगोलियामध्ये शेकडो मेंढ्या 10 पेक्षा अधिक दिवसांपासून एका सर्कलमध्ये फिरत आहेत. पण त्या असं का करत आहेत याचं रहस्य अजून समोर आलेलं नाही.
हा व्हिडीओ शेअर करून दोन दिवस झाले आहेत आणि अजूनही मेंढ्या तशाच चालत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मेंढ्या ज्या लोकांनी पाळल्या आहेत ते स्वत: हैराण झाले आहेत. ते म्हणाले की, सुरूवात काही मोजक्या मेंढ्यांपासून झाली होती. आता सगळ्याच तशा चालत आहेत. ते विचारत पडले आहेत.
काहीच खात नाहीयेत
या मेंढ्यांच्या मालकांना हे समजत नाहीये की, त्या अशा का करत आहेत. जेव्हा या मेंढ्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले तेव्हा वैज्ञानिकही हैराण झाले. काही मेंढ्य राउंडमध्ये शांतपणे उभ्या आहेत आणि बाकी गोल चक्कर मारत आहेत. अजून एक हैराण करणारी बाब म्हणजे त्या काही खातही नाहीयेत. पण तरीही त्या पूर्णपणे निरोगी आहेत. या घटनेबाबत एक तर्क दिला जात आहे की, लिस्टेरियोसिस नावाच्या एका रोगामुळे प्राण्याचं वागणं असं होतं.
यामुळे प्राणी एका सर्कलमध्ये फेऱ्या मारू लागतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा रोग मेंढ्यांच्या आहारासंबंधी असतो आणि त्यांच्या मेंदूला प्रभावित करतो. यामुळे त्यांच्या मेंदूवर सूज येते आणि त्यांना भटकल्यासारखं वाटतं. या रोगामुळे शरीराला लकवाही जातो.