अबब! मुल जन्माला घालण्यासाठी कंपनीची बंपर ऑफर; ११ लाख रोख अन् वर्षभर सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 06:26 PM2022-01-30T18:26:19+5:302022-01-30T18:27:30+5:30

चीन सरकारच्या या बदललेल्या पॉलिसीला नजरेसमोर ठेवत एका कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना बंपर ऑफर दिली आहे.

China The company's bumper offer for child birth; 11 lakh cash and holiday throughout the year | अबब! मुल जन्माला घालण्यासाठी कंपनीची बंपर ऑफर; ११ लाख रोख अन् वर्षभर सुट्टी

अबब! मुल जन्माला घालण्यासाठी कंपनीची बंपर ऑफर; ११ लाख रोख अन् वर्षभर सुट्टी

Next

गेल्या अनेक दशकांपासून सिंगल चाइल्ड पॉलिसीचा वापर करणाऱ्या चीनचा डेमोग्राफीवर मागील वर्षी अजब संकट उभं राहिलं. चीनच्या एकूण लोकसंख्येत अधिक वयाची लोकं जास्त असल्याने कामकाज करणाऱ्या वयोगटातील लोकांची कमतरता भासू लागली. याच संकटाला घाबरुन चीनच्या सरकारनं आता जोडप्यांना एकापेक्षा अधिक मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

चीन सरकारच्या या बदललेल्या पॉलिसीला नजरेसमोर ठेवत एका कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना बंपर ऑफर दिली आहे. तिसरा मुलगा जन्माला घालणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीनं एक वर्ष सुट्टी तसेच ११.५० लाख बोनस देण्याची घोषणा केली आहे. चीनी वृत्तपत्र नॅशनल बिझनेस डेलीनं याबाबत रिपोर्ट दिला आहे. रिपोर्टच्या मते, चीनमध्ये बेबी बोनस, एक्सटेंडेड पेड लीव्स, करात सूट, मुलांचे पालनपोषण करण्यासाठी सब्सिडीसारख्या योजना आणल्या आहेत. हा सर्व खटाटोप तिसरं बाळ जन्माला घालण्यासाठी करण्यात येत आहे. सरकारसोबतच अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना यासाठी बोनस ऑफर दिली आहे.

‘या’ कंपनीनं दिली ऑफर

टेक कंपनी Beijing Dabeinong Technology ग्रुपनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना तिसरं आपत्य जन्माला घालण्यासाठी बंपर ऑफर दिली आहे. कंपनीनं यासाठी कर्मचाऱ्यांना ९० हजार युआन(११.५० लाख रुपये) रोख आणि त्याशिवाय वर्षभराची सुट्टी देत आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी ही सुट्टी १२ महिन्यापर्यंत आहे. तर पॅरेंटल लीव ९ महिन्यापर्यंत दिली जात आहे. इतकचं नाही तर कंपनीनं पहिलं, दुसरं बाळ जन्माला घालण्यासाठीही बोनस दिला आहे. पहिल्या मुलासाठी ३० हजार युआन म्हणजे ३.५४ लाख बोनस तर दुसऱ्या बाळासाठी या कंपनीने ६० हजार युआन म्हणजे ७ लाख रुपयांहून अधिक बोनस म्हणून दिले आहेत.

चीनमधील अनेक स्थानिक सरकार त्यांच्याकडून लोकांना बोनस देत आहेत. अलीकडेच Panzhihua शहराच्या प्रशासनाने दुसरं आणि तिसरं बाळ जन्माला घालण्यासाठी ६०० युआन म्हणजे ६ हजार रुपये प्रत्येक महिन्याला देण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय चीनच्या सेंट्रल गवर्नमेंटनं पहिल्यापासून ९८ दिवसांची मॅटर्नल लीव देण्याची तरतूद केली आहे.

Web Title: China The company's bumper offer for child birth; 11 lakh cash and holiday throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन