China weird tradition: गरोदर पत्नीला खांद्यावर घेऊन जळत्या कोळशावर चालतो पती, काय आहे ही विचित्र परंपरा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:20 PM2022-04-18T14:20:21+5:302022-04-18T14:21:46+5:30
China weird tradition: पत्नी 9 महिन्यांची गरोदर असते, तेव्हा पती तिला खांद्यावर घेऊन जळत्या कोळशावर चालतो. यामागे दोन मान्यता आहेत.
China weird tradition: पृथ्वीवर असे अनेक देश आहे, जिथे विचित्र आणि धक्कादायक परंपरा पाळल्या जातात. काही परंपरा सामान्य आणि दिसायला सोप्या दिसतात, तर काही परंपरा अतिशय अवघड असतात. अशाच प्रकारची एक विचित्र परंपरा भारताचा शेजारील देश असलेल्या चीनमध्ये पाळल्या जातात. यात गरोदर पत्नीला खांद्यावर घेऊन पती जळत्या कोळशावरुन चालतो.
चीनमध्ये अनेक चित्र-विचित्र परंपरा पाळल्या जातात. याच देशात डॉग मीट फेस्टिव्हलदेखील(कुत्र्याचे मांस खाणे) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यावर जगभरातून टीका होत असते. त्याचप्रमाणे, जळत्या कोळशावरुन चालण्याही परंपराही येथे मोठ्या प्रमाणात पाळली जाते. पती आपल्या गरोदर पत्नीला खांद्यावर घेतो आणि अनवाणी पायाने जळत्या कोळशावरुन चालतो.
यामागची धारणा काय आहे?
या परंपरेमागची धारणाही फार विचित्र आहे. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, गरोदरपणाच्या 9 महिन्यांत बायकांचा मूड खूप बदलतो. त्यांची प्रकृतीही चांगली नसल्याने त्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्यांना प्रसूती वेदनांचा त्रासही सहन करावा लागतो. अशा स्थितीत जेव्हा नवरा बायकोला खांद्यावर घेऊन कोळशावर चालतो, तेव्हा त्याला दाखवायचे असते की गरोदरपणाच्या संपूर्ण प्रवासात तो आपल्या पत्नीसोबतच आहे. काही लोक मानतात की, पती कोळशावर चालल्यावर त्यांची मुले निरोगी जन्माला येतात आणि पत्नीला बाळंतपणाच्या वेदनाशी लढण्याची हिंमत मिळते.