हत्तीने शोधून काढली ड्रग्सने भरलेली बॅग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:05 AM2023-08-29T11:05:44+5:302023-08-29T11:07:30+5:30
व्हिडिओच्या सुरूवातीला चार हत्ती एका गावातून बाहेर निघताना दिसत आहेत. तेव्हाच एक हत्ती अचानक थांबतो.
आशियातील एका हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हत्तीने 2.8 किलो ड्रग्स शोधून काढलं आहे. ही घटना दक्षिण चीनच्या युन्नान प्रांतातील आहे. व्हिडिओच्या सुरूवातीला चार हत्ती एका गावातून बाहेर निघताना दिसत आहेत. तेव्हाच एक हत्ती अचानक थांबतो. त्याला तिथे एक बॅग पडलेली दिसते. जी तो सोंडेने उचलून मागच्या बाजूला फेकतो.
ही बॅग पोलिसांच्या हाती लागली. जी तिथे आधीपासून होती. पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन हत्तीची तिथून जाण्याची वाट पाहिली. व्हिडिओत बघू शकता की, हत्ती गेल्यानंतर पोलीस तिथे येतात आणि बॅगमधील वस्तू बघतात. पोलिसांना त्यात ड्रग्स सापडतं. ही बॅग शोधून काढण्यासाठी हत्तीचं सोशल मीडियाव कौतुक केलं जात आहे.
Recently, a video about a wild Asian elephant "helping" the border police in Yunnan Province of southwest China by sniffing out a bag of opium went viral among Chinese netizens. #ChinaBiodiversity#PlanetMatterspic.twitter.com/8U5vTgidaM
— WatchTower 环球瞭望台 (@WatchTowerGW) August 24, 2023
या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, 'हत्ती पृथ्वीवरील सगळ्यात प्रतिभावान जीव आहे'. दुसऱ्याने लिहिलं की, 'हत्ती कमाल आहे'. अशाच वेगवेगळ्या कमेंट्स लोक या व्हिडिओवर करत आहेत.