काही दिवसांनी लग्न होणार तेव्हा समजलं पुरूष आहे होणारी नवरी, 27 वर्ष मुलगी बनून जगली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:43 AM2024-05-06T09:43:51+5:302024-05-06T09:44:18+5:30
ही घटना चीनमधील असून इथे राहणारी ली हिला कधी इतर मुलींसारखी मासिक पाळी आली नाही. ना तिच्या स्तनांचा विकास झाला. लवकरच तिचं लग्न होणार होतं.
एक व्यक्ती त्याच्या आयुष्यातील 27 वर्ष एक मुलगी म्हणून जगला. पण जेव्हा लग्नाआधी मेडिकल टेस्ट केली तेव्हा समजलं की, तो एक मुलगा आहे. मेडिकल टेस्टमधून त्याच्या पोटातील टेस्टिकलबाबत समजलं, ज्यातून असं समोर आलं की, तो बायोलॉजिकली एक पुरूष आहे. हे पुरूषांमध्ये आढळणारे दोन गोल आकाराचे अवयव असतात. हे मेल हार्मोन आणि स्पर्म तयार करतात. ही घटना चीनमधील असून इथे राहणारी ली हिला कधी इतर मुलींसारखी मासिक पाळी आली नाही. ना तिच्या स्तनांचा विकास झाला. लवकरच तिचं लग्न होणार होतं.
18 वर्षाची असताना ती एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये टेस्ट करण्यासाठी गेली होती. तेव्हा तिला डॉक्टरांनी सांगितलं की, हार्मोनचं असंतुलन आणि ओवेरिअन फेलिअरने पीडित हे. डॉक्टरांनी तिला काही टेस्ट करण्यास सांगितलं. पण ली आणि तिच्या परीवाराने या गोष्टीकडे गंभीरतेने बघितलं नाही. पण जेव्हा ली चं लग्न होणार होतं तेव्हा तिने पुन्हा एकदा शरीराची टेस्ट करण्याचा विचार केला. यावेळी अनुभवी स्त्री रोग डुआन जी ने टेस्ट केल्या.
त्यांनी तिला सांगितलं की, तिला कंजेनिटल एड्रेनल हाइपरप्लासिया(CAH) आजार आहे. टेस्टच्या रिपोर्टची एक महिना वाट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, ली मध्ये पुरूष सेक्स क्रोमोसोम्स आहेत, पण ती दिसायला महिलेसारखी आहे. डुआन म्हणाले की, सामाजिक रूपाने ली एक महिला आहे. पण क्रोमोसोमली पुरूष आहे. जेव्हा ली ला याबाबत समजलं तेव्हा तिला धक्का बसला. कारण जन्म झाल्यापासून ती एका महिलेसारखी जगत होती. पण आता तिने सत्य स्वीकारलं आहे.
दर 50,000 मधून 1 नवजात बाळ CAH ने पीडित असतं. ली च्या आई वडिलांमध्ये जीनशी संबंधित समस्या आहे. त्यामुळे ली सुद्धा अशाच आजाराने पीडित झाली. टेस्टमधून समजलं की, सुरूवातीला उपचार न मिळाल्याने ली ला ऑस्टियोपोरोसिस आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचा सामना करावा लागला होता. डॉक्टरांनी ली च्या पोटातील टेस्टिकल्स सर्जरी द्वारे काढण्याचा सल्ला दिला होता. कारण यामुळे तिला कॅन्सरचा धोका होता. 11 एप्रिलला ली ची सर्जरी करण्यात आली. आता ली ला आणखी काही टेस्टमधून जावं लागेल. बराच काळ तिला हार्मोन थेरपी घ्यावी लागेल.
सोशल मीडियावर या घटनेवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. लोक तिच्या हिंमतीला दाद देत आहेत. मात्र, तिच्या लग्नाबाबत पुढे काय झालं याबाबत काहीच सांगण्यात आलेलं नाही. डॉक्टरांना इतरांनाही सल्ला दिला की, ज्या लोकांना ली सारखी लक्षण दिसतात त्यांनीही लगेच टेस्ट कराव्या आणि योग्य ते उपचार घ्यावेत.