ऑफिसमधील प्रेग्नेंट महिलेला स्लो पॉयझन देत होती सहकारी, कारण वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:51 AM2024-04-02T09:51:34+5:302024-04-02T09:52:45+5:30

येथील एका महिलेने ऑफिसमधील काम टाळण्यासाठी आपल्याच सहकारी महिलेसोबत असं काही केलं ज्याची कल्पनाही करू शकत नाही.

China : Woman poisons pregnant co-worker to prevent higher workload because of maternity leave she will take | ऑफिसमधील प्रेग्नेंट महिलेला स्लो पॉयझन देत होती सहकारी, कारण वाचून बसेल धक्का...

ऑफिसमधील प्रेग्नेंट महिलेला स्लो पॉयझन देत होती सहकारी, कारण वाचून बसेल धक्का...

जगभरात रोज अजब आणि हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. आपला शेजारी देश चीनमधूनही अनेक धक्कादायक किंवा विचित्र घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने ऑफिसमधील काम टाळण्यासाठी आपल्याच सहकारी महिलेसोबत असं काही केलं ज्याची कल्पनाही करू शकत नाही.

हुबेई प्रांतातील एका गवर्नमेंट अफेलेटेड इंस्टीट्यूशनमध्ये काम करणाऱ्या एका गर्भवती महिलेला ऑफिसमध्ये अचानक पाण्याचा टेस्ट वेगळी लागली. तिला संशय आला की, ऑफिसमधील पाण्यात काहीतरी गडबड आहे. तर तिने बाहेरून पाणी आणणं सुरू केलं. पण टेस्टमध्ये अजूनही गडबड होती. तेव्हा तिने याचा शोध घेण्याचं ठरवलं.

पाण्याच्या या चर्चेदरम्यान गर्भवती महिलेच्या एका मित्राने गंमतीने म्हटलं की, ऑफिसमध्ये तुला कुणीतरी विष देण्याचा प्रयत्न करत आहे. महिलेने याकडे गंभीरतेने पाहिलं आणि आपल्या डेस्कवर रेकॉर्डिंगसाठी एक टॅब ठेवला. 

या टॅबच्या रेकॉर्डिंगमध्ये तिला दिसलं की, जेव्हा ती तिच्या डेस्कवर नव्हती तेव्हा तिच्या एका महिला सहकारीने तिच्या पाण्याच्या बॉटलमध्ये पावडरसारखं काहीतरी टाकलं आणि तिथून निघून गेली.

जेव्हा गर्भवती महिलेने सहकारी महिलेला याचा जाब विचारला तेव्हा तिने दिलेलं उत्तर ऐकून महिला हैराण झाली. सहकारी महिला म्हणाली की, तिने पाण्यात स्लो पॉयझन टाकलं होतं जेणेकरून तिची प्रग्नेंसी टर्मिनेट व्हावी म्हणजे तिचा गर्भपात व्हावा.

कारण ती जर गर्भवती राहिली तर मेटरनिटी लिव्हवर जाईल आणि यादरम्यान विष देणाऱ्या महिलेवर कामाचा लोड वाढेल. फक्त हे कामाचं ओझं तिच्यावर येऊ नये म्हणून या सहकारी महिलेने गर्भवती महिलेच्या पाण्यात विष टाकलं.

पीडित महिलेने लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि आता यावर चौकशी सुरू आहे. अधिकारी या घटनेकडे फार गंभीरतेने बघत आहेत. कारण हा मोठा गुन्हा ठरू शकतो. सध्या या घटनेची चीनच्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनेक लोक ही घटना वाचून हैराण झाले आहेत.
 

Web Title: China : Woman poisons pregnant co-worker to prevent higher workload because of maternity leave she will take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.