एकाचवेळी ६ पुरूषांना डेट करत होती महिला, एकाला आला संशय आणि मग झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 01:16 PM2022-03-29T13:16:05+5:302022-03-29T13:17:50+5:30
China : महिला एकाचवेळी सहा पुरूषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून फायदा करून घेत होती. जेव्हा लोकांना तिचा हा कारनामा समजला तेव्हा लोक तिचं टाइम मॅनेजमेंट पाहून अवाक् झाले.
आतापर्यंत फसवणुकीच्या किंवा प्रेमात दगा मिळाल्याच्या अनेक विचित्र घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण महिलेने काही पुरूषांची अशी काही फसवणूक केली की, सगळेच हैराण झाले. आश्चर्याची बाब म्हणजे लोक तिच्या दग्याची कहाणी वाचून तिचं कौतुक करत आहेत. महिला एकाचवेळी सहा पुरूषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून फायदा करून घेत होती. जेव्हा लोकांना तिचा हा कारनामा समजला तेव्हा लोक तिचं टाइम मॅनेजमेंट पाहून अवाक् झाले.
ही घटना चीनमधून China) समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या सुंदरतेचा वापर करून एकाचवेळी ६-६ लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं. आणि मग त्यांच्याकडून महागडे गिफ्ट्स घेत होती. महिलेचं वय ४२ आहे. पण पुरूषांना तिच्यासोबत वेळ घालवणं फार चांगलं वाटत होतं. त्यामुळे ते तिच्यावर कधी संशयही घेत नव्हते. पण महिलेच्या काही गोष्टीनंतर तिच्या एका बॉयफ्रेन्डला संशय आला आणि तेव्हा त्याच्यासमोर सगळं काही आलं.
प्रेमाच्या नावावर महिला एकाचवेळी ६ पुरूषांना डेट करत होती. ही घटना २०२१ डिसेंबरच आहे. महिला त्यांच्याकडून गिफ्ट म्हणून स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि कपड्यांसोबतच महागड्या वस्तू घेत होती. सगळं काही ठीक सुरू होतं, पण एक दिवस सहापैकी तिच्या एका बॉयफ्रेन्डला संशय आला आणि सगळं काही समोर आलं.
चीनी वृत्तपत्र Daily Economic News नुसार, यु नावाची ही व्यक्ती माओ नावाच्या या महिलेला डेटिंग साइटवर भेटला होता. त्याने सुरूवातीला तर महिलेच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पण लग्नाचं नाव काढताच तिने टाळाटाळ केली. तेव्हा त्याला संशय आला. महिलेने लग्नाच्या ड्रेससाठी त्याच्याकडून पैसे घेतले, पण नंतर लग्नास नकार दिला.
काय म्हणाले लोक?
माओने लग्नास नकार दिला तेव्हा त्याने पोलिसांना बोलवलं. त्यानंतर हे सगळं समोर आलं. चौकशीतून समोर आलं की, यू एकटाच नाहीये जो माओच्या जाळ्यात अडकला. ती आणखी ५ पुरूषांना अशाचप्रकारे मूर्ख बनवत होती. तिने सहा महिन्यात ६ पुरूषांकडून १८ लाख रूपये लुटले. आता तिच्यावर पोलीस केस झाली असून पुढील तपास सुरू आहे.
सोशल मीडियावर जेव्हा या बातमीची चर्चा झाली तेव्हा लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले. अनेकांनी महिलेच्या टाइम मॅनेजमेंटचं कौतुक केलं. तर पुरूषांची खिल्ली उडवली. जे तिच्या जाळ्यात अडकले होते.