घटत्या लोकसंख्येमुळे चीनचा अजब निर्णय; लग्न न झालेल्या जोडप्यांना दिली मोठी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 01:43 PM2023-03-08T13:43:50+5:302023-03-08T13:48:23+5:30
चीनमध्ये अधिक मुले जन्माला येण्यासाठी लोकांना विशेष सुविधा देण्यात येत आहेत.
दिवसेंदिवस लोकसंख्येत होणारी घट पाहता चीनची डोकेदुखी वाढली आहे. लोकसंख्या वाढीसाठी चीन आता अजबगजब कायदे बनवू लागला आहे. चीनने लोकांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालणे आणि लग्न सहजपणे व्हावे यासाठी ब्राइड प्राइस नावाची परंपरा संपुष्टात आणली आहे. ही परंपरा म्हणजे मुले मुलीकडच्यांना हुंडा देतात. या लग्नासाठी जवळपास वर्षभर जातो. त्याशिवाय लग्नावरही मोठा खर्च होतो. त्यामुळे अनेक तरुण लग्नही करत नाहीत. आता चीन सरकारने ही परंपरा संपवण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय चीन सरकारने लग्न न करता बाळ जन्माला घालण्याची परवानगी दिली आहे.
लोकसंख्या वाढीसाठी चीनची उपाययोजना
चीन देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी सतत नवीन उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दशकांत चीनमध्ये जन्म दर कमी झाला आहे. इथल्या वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढली आहे, तर युवक आणि कामगार लोक कमी झाले आहेत. यामुळे अस्वस्थ चीनने गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या.
हुंडा प्रणालीविरूद्धही उचलली पावले
लोकांनी हुंडा प्रणाली आणि खर्चिक विवाहसोहळाविरूद्धही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जागरूकता मोहिम आयोजित केली जात आहे. या व्यतिरिक्त, अनेक ठिकाणी महिला दिनानिमित्त चीनी सरकारकडून सामूहिक विवाह देखील आयोजित केले जात आहेत.
कपल लिव्ह-इनमध्येही मुले जन्माला घालू शकतात
चीनमध्ये अधिक मुले जन्माला येण्यासाठी लोकांना विशेष सुविधा देण्यात येत आहेत. चीनमध्ये एक पुराणमतवादी समाज आहे आणि तेथे कठोर नियम पाळले जातात. परंतु आजकाल चीन सरकार लोकसंख्या वाढविण्यासाठी अशा अनेक उपायांचा अवलंब करीत आहे, ज्याने अनेक जण हैराण झाले आहेत. नियम बदलून चीनच्या सिचुआन प्रांतात आता लग्न न झालेल्या जोडप्यांनाही प्रसूतीची रजा आणि वैद्यकीय खर्च प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. सिचुआनमध्ये आता लग्न न होता झालेल्या आईलाही त्या सरकारी सुविधांचा फायदा होईल, जे आतापर्यंत फक्त विवाहित जोडप्यांना मिळत असे. सिचुआन हा चीनमधील ५ वा सर्वात मोठा प्रांत आहे. त्याची लोकसंख्या सुमारे साडेतीन कोटी आहे, जी कमी होत आहे. या कारणास्तव, सिचुआन प्रांताने बाकी देशापेक्षा एक पाऊल पुढे विचार केला आहे. देशातील तीन मुलांच्या धोरणाऐवजी सिचुआनने मुलांच्या संख्येवरील प्रत्येक बंदी उठवली आहे.
या सुविधा चीनमध्ये उपलब्ध
मुले होण्यासाठी सरकारने नव्याने विवाहित जोडप्यांना ३० दिवसांची पगाराची रजा देण्याची घोषणा केली आहे. याचा हेतू असा आहे की पती -पत्नी वेळ घालवू शकतात आणि लोकसंख्या वाढविण्यात भागीदार बनू शकतात. यापूर्वी चीनमध्ये लग्नासाठी फक्त तीन दिवसांची पगाराची रजा होती.