कोल्ड ड्रिंक्स पितोय हा चायनीज बकरा, परिसरात चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 04:00 PM2018-08-22T16:00:59+5:302018-08-22T16:01:37+5:30
चायनीज'ला पाहण्यासाठी मालकाच्या घरासमोर लोकांची गर्दी होत आहे.
अलीगड : उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये असलेला अडीच फुटाचा बकरा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बकऱ्याची खाशियत त्याच्या उंचीवरुनच नाही तर खाण्या-पिण्यावरुन सुद्धा आहे. हा बकरा चीनहून आणला आहे. त्यामुळे या बकऱ्याचे नाव 'चायनीज' असे ठेवले आहे. 'चायनीज'ला पाहण्यासाठी मालकाच्या घरासमोर लोकांची गर्दी होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी येथील स्थानिक मीडियामध्ये 'चायनीज'बद्दल बातमी आली होती. या बातमीनंतर 'चायनीज'चे मालक अब्दुल वासिद यांच्या घराबाहेर त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. लांबून लोक 'चायनीज'ला पाहण्यासाठी येत आहेत. काही लोकांनी 'चायनीज'ला खरेदी करण्यासाठी मालकाला ऑफर दिली आहे. मात्र अब्दुल वासिद यांनी 'चायनीज'ला विकण्यास नकार दिला आहे.
दोन महिन्यात 70 किलो वजन वाढले...
अब्दुल वासिद यांनी सांगितले की, माझ्या घरातील मंडळी 'चायनीज'ची कुर्बानी देणार होते. मात्र त्याला काही दिवस पाळण्याचा मी निर्णय घेतला आहे. 'चायनीज'चे दोन महिन्यात 70 किलो वजन वाढले आहे. त्याच्या आहारामध्ये फळे, ड्राय फ्रूट्स असते. तसेच, 'चायनीज' कोल्ड ड्रिंक्स पितो. त्याला कोल्ड ड्रिंक्समध्ये जास्तकरुन पेप्सी, थम्स अप आणि कोकाकोला जास्त पसंत आहे, असे अब्दुल वासिद म्हणाले.