असं शहर जिथे एका-एका पुरूषाकडे आहेत ३ गर्लफ्रेन्ड, महिलाच लुटवतात पुरूषांवर पैसे; कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 02:17 PM2021-11-09T14:17:12+5:302021-11-09T14:17:53+5:30
आजकाल लोकांच्या प्राथमिकता आणि महत्वाकांक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे रिलेशनशिपसाठी आदर्श व्यक्तीचा शोध कठीण झाला आहे. हेच कारण आहे की, बरेच लोक सिंगल राहतात. पण चीनमध्ये एक असं शहर आहे जिथे एकही पुरूष सिंगल नाही.
बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड बनवण्याचं चलन जगात काही नवीन नाही. प्रेम हे आपल्या समाजाचं वास्तव आहे. तसं बघायला गेलं तर बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेन्ड बनवणं प्रेम कमी आणि पीयर प्रेशर जास्त झालं आहे. म्हणजे एक मित्र रिलेशनशिपमध्ये असेल तर दुसऱ्या मित्रालाही रिलेशनशिप हवं आहे. आजकाल लोकांच्या प्राथमिकता आणि महत्वाकांक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे रिलेशनशिपसाठी आदर्श व्यक्तीचा शोध कठीण झाला आहे. हेच कारण आहे की, बरेच लोक सिंगल राहतात. पण चीनमध्ये एक असं शहर आहे जिथे एकही पुरूष सिंगल नाही. इथे पुरूषांना एक नाही तर तीन गर्लफ्रेन्ड्स असतात.
आम्ही तुम्हाला सांगतोय चीनचं शहर डॉन्ग्गुआनबाबत. गुआंगडॉन्ग प्रांतातील या शहरात राहणाऱ्या जवळपास सर्वच पुरूषांकडे एकापेक्षा जास्त गर्लफ्रेन्ड आहेत. अनेकांना तर तीन गर्लफ्रेन्ड आहेत. इंडिपेंडेंट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, इथे ज्या लोकांना एकच गर्लफ्रेन्ड असते त्यांना कमीपणा वाटतो. याचं सर्वात मोठं कारण आहे स्त्री-पुरूष प्रमाण.
डेली मेल वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, शहरात दर १०० महिलांच्या तुलनेत ८९ पुरूष आहेत. या लोकसंख्या असमानतेमुळे पुरूषांना गर्लफ्रेन्ड सहजपणे मिळतात. पण महिलांना बॉयफ्रेन्ड बनवण्यासाठी पुरूषांची कमी भासते. न्यूज डॉट कॉम एयूसोबत बोलताना एका व्यक्तीने सांगितलं की, या शहरात नोकरी मिळणं कठीण आहे, पण मुलगी गर्लफ्रेन्ड सोपं आहे. फॅक्टरीमद्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, त्याला ३ गर्लफ्रेन्ड आहेत आणि त्या तिघींनाही एकमेकींबाबत माहीत आहे.
हे शहर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी ओळखलं जातं. येथील फॅक्टरींमध्ये अनेक तरूणी काम करतात. लोक सांगतात की, त्यांच्यासोबत सहजपणे मैत्री होते. कारण त्या स्वत: बॉयफ्रेन्डच्या शोधात असतात. मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अनेकदा तर महिला बॉयफ्रेन्ड बनवण्यासाठी त्यांचा खर्चही उचलतात.