अजबच! 30 मिनिटात 5 किमी धावायचं होतं, कर्मचारी हरला; कंपनीने नोकरीहून काढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 04:05 PM2023-07-01T16:05:24+5:302023-07-01T16:05:38+5:30

लियुने मेकॅनिकल पार्ट्स फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं होतं आणि अनेक टेस्टमधून त्याला जावं लागलं. त्याने सगळ्या टेस्ट चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. त्याला नोकरीवर ठेवण्यात आलं.

Chinese company fired employee for loosing in race | अजबच! 30 मिनिटात 5 किमी धावायचं होतं, कर्मचारी हरला; कंपनीने नोकरीहून काढलं!

अजबच! 30 मिनिटात 5 किमी धावायचं होतं, कर्मचारी हरला; कंपनीने नोकरीहून काढलं!

googlenewsNext

आजकाल सगळ्यात क्षेत्रात स्पर्धा किती वाढली आहे हे तुम्हाला माहीत आहेच. एका नोकरीसाठी हजारो लोक समोर येतात. पण एकालाच नोकरी लागते. याच कारणाने कंपन्याची सिलेक्शन प्रोसेस आणखी कठिण करतात. जेणेकरून बेस्ट कर्मचारी घेता यावा. याच कारणाने एका चीनी कंपनीने इंजीनिअर पदासाठी एक रेसिंगचं चॅलेंज ठेवलं. त्यात कर्मचारी हरला तर त्याला नोकरीवरून काढण्यात आलं.

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, चीनच्या जियांगसू प्रांतातील सुजाओ शहरात लियु (Liu) नावाची एक व्यक्ती राहते. ज्याने त्याच्या कंपनी विरोधात केस दाखल केली आहे. त्याने सांगितलं की, कंपनीने कथितपणे त्याला फक्त या कारणाने नोकरीहून काढलं कारण तो एक रेस पूर्ण करू शकला नाही. कंपनीने त्याच्यासमोर 30 मिनिटात 5 किलोमीटर धावण्याचं चॅलेंज ठेवलं होतं. तेही 40 डिग्री सेल्सियस तापमानात. पण तो हे रस हरला आणि त्याची नोकरी गेली.

रिपोर्टनुसार, लियुने मेकॅनिकल पार्ट्स फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं होतं आणि अनेक टेस्टमधून त्याला जावं लागलं. त्याने सगळ्या टेस्ट चांगल्या पद्धतीने पार पाडल्या. त्याला नोकरीवर ठेवण्यात आलं. पण त्याला हे माहीत नव्हतं की, आणखी एक मोठं चॅलेंज त्याला पूर्ण करायचं आहे. 
नोकरी जॉइन केल्यावर काही दिवसातच कंपनीने लियुला सांगितलं की, त्याला एक लॉंग डिस्टन्स रनिंग टेस्ट द्यावी लागेल. लियुकडे ट्रेनिंगसाठीही वेळ नव्हता. ज्या दिवशी रेस होती त्या दिवशी तापमान 40 डिग्री होतं.

इतक्या उन्हात केवळ 800 मीटर धावूनच त्याला चक्कर येत होती आणि थांबून कामावर परत आला. कुणी त्याला काहीच बोललं नाही म्हणून त्याला वाटलं की, रेस अशीच ठेवली असेल. दुसऱ्या दिवशी त्याला नोकरीहून काढल्याचं लेटर मिळालं. ज्यात लिहिलं होतं की, तो त्याच्या प्रोबेशन पीरियडमध्ये फेल झाला. 

कंपनीने सांगितलं की, ते ही रेस यासाठी घेतात जेणेकरून कर्मचाऱ्यांमधील काम करण्याची भावना टेस्ट करता यावी. लियुने कोर्टात केस केली आणि सांगितलं की, जॉयनिंगच्या आधी रेसची माहिती देण्यात आली नव्हती. कोर्टानेही त्याचा दावा मान्य केलं आणि कंपनीला आदेश दिला की, नुकसान भरपाई म्हणून लियुला 82 हजार रूपये द्यावे.

Web Title: Chinese company fired employee for loosing in race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.