आगीत घाला किंवा उन्हात ठेवा! तरीही विरघळणार नाही हे आईसक्रीम, असं काय आहे यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:27 PM2022-07-29T18:27:47+5:302022-07-29T18:29:56+5:30

चीननं असं आइस्क्रीम बनवलं आहे, की जे कडक उन्हातही वितळत नाही. सध्या या खास आइस्क्रीमची चायनीज सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.

chinese company ice cream dose not melt in 31 degree Celsius | आगीत घाला किंवा उन्हात ठेवा! तरीही विरघळणार नाही हे आईसक्रीम, असं काय आहे यात?

आगीत घाला किंवा उन्हात ठेवा! तरीही विरघळणार नाही हे आईसक्रीम, असं काय आहे यात?

Next

आइस्क्रीम  हा अनेकांचा आवडता पदार्थ असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आइस्क्रीम खूप आवडतं; पण आइस्क्रीम खायला थोडा जास्त वेळ लागला, तर ते वितळायला लागतं. चीनने ही तक्रार दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. चीननं असं आइस्क्रीम बनवलं आहे, की जे कडक उन्हातही वितळत नाही. सध्या या खास आइस्क्रीमची चायनीज सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.

सर्वसामान्यपणे फ्रीजरमधून बाहेर काढल्यानंतर आइस्क्रीम लगेच वितळण्यास सुरुवात होते. यावर चीनने एक खास उपाय शोधला आहे. चीनमधल्या प्रीमियम आइस्क्रीम कंपनीनं असं आइस्क्रीम तयार केलं आहे, जे 31 अंश सेल्सिअस तापमान असतानासुद्धा वितळत नाही. चीनमधल्या सोशल मीडियावर सध्या या आइस्क्रीमची जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच, या आइस्क्रीमवरून वादविवादही सुरू झाले आहेत. थंड आइस्क्रीम उष्णतेमुळं विरघळत नाही, ही गोष्ट चिनी नागरिकांच्या पचनी पडत नसल्याचं चित्र आहे. हे नेमकं कशामुळं घडतंय ते जाणून घेऊ या.

चीनमधल्या झोंगक्सुएगाओ  या प्रसिद्ध आइस्क्रीम कंपनीनं हे आइस्क्रीम तयार केलं आहे. चीनमध्ये ही कंपनी दर्जेदार उत्पादनांसाठी ओळखली जाते. चायनीज सोशल मीडियावर एका युझरने या कंपनीच्या आइस्क्रीमची थर्मामीटर टेस्ट करतानाचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात 31 अंश सेल्सिअस तापमानातही हे आइस्क्रीम वितळत नसल्याचं दिसत आहे. या तापमानात सुमारे दीड तास आइस्क्रीम ठेवलं, तरी ते वितळलं नाही, असा दावा केला गेला आहे. ही पोस्ट लक्षवेधी ठरली आणि अनेकांनी आइस्क्रीमची चाचणी घेण्यास सुरुवात केली. काहींनी टॉर्चनं तर काहींनी मेणबत्तीच्या ज्योतीमुळे आइस्क्रीम वितळतं का हे पाहण्याचा प्रयत्न केला; पण आइस्क्रीम वितळलं नाही. त्यामुळे आइस्क्रीमचा वरचा भाग जळला, पण आइस्क्रीम काही वितळलं नाही.

आइस्क्रीम का वितळलं नाही?
या प्रकरणावर बराच गदारोळ झाल्यानंतर झोंगक्सुएगाओ कंपनीकडून सांगण्यात आलं की, या आइस्क्रीममध्ये घनता/चिकटपणा (Viscosity) वाढवणाऱ्या एजंटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आइस्क्रीम सहजासहजी वितळत नाही. हे आइस्क्रीम आरोग्यास हानिकारक नसून, राष्ट्रीय अन्न सुरक्षितता मानकांद्वारे प्रमाणित असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे. हा चीनचा प्रीमियम ब्रॅंड आहे. तसंच त्यांच्या स्वस्त आइस्क्रीमची किंमतदेखील सुमारे 150 रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्यांनी आइस्क्रीमशी संबंधित माहिती ग्राहकांना दिली आहे.

Web Title: chinese company ice cream dose not melt in 31 degree Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.