VIDEO: 6 वर्षाच्या मुलाला वर्षभर रात्ररात्र जागून शिकवलं मॅथ्स, रिझल्ट बघून वडील ढसाढसा रडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 01:49 PM2022-07-02T13:49:54+5:302022-07-02T13:52:40+5:30
Chinese father teach 6 year old son maths : चीनमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलांनी आपल्या 6 वर्षाच्या मुलाला 1 वर्ष खूप अभ्यास घेतला. पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं की, आपल्या मुलांना खूप अभ्यास करावा आणि परीक्षेत त्याला चांगले मार्क्स मिळावेत. हेही तितकंच खरं आहे एकट्या मुलांची परीक्षा नसते तर आई-वडिलांची देखील असते. त्यामुळे ते सुद्धा मुलांचा अभ्यास घेतात. पण काही मुलांची अभ्यासात मन लागण्याला एक लिमिट असते. चीनमधून (China) अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका वडिलांनी आपल्या 6 वर्षाच्या मुलाला 1 वर्ष खूप अभ्यास (Chinese father teach 6 year old son maths) घेतला. पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
सध्या सोशल मीडिया वीबोवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती कॅमेरासमोर ढसाढसा रडत आहे. मजेदार बाब ही आहे की, ही व्यक्ती अशा गोष्टीवर रडत आहे जी त्याच्या हातात नाही. 'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, हेनान प्रांतातील जेंगजाउमध्ये एका वडिलाला मोठा धक्का बसला. या व्यक्तीने पूर्ण वर्षभर आपल्या मुलाला मॅथ्स शिकवलं. त्याला वाटत होतं की, त्यांच्या 6 वर्षाच्या मुलाने टॉप करावं.
इतके महिने आणि इतक्या मेहनतीने शिकवल्यानंतर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्याची बोलती बंद झाली. त्याचं कारण त्याचा मुलगा परीक्षेत नापास झाला. 100 गुणांपैकी त्याला केवळ 6 गुण मिळाले. हे बघून वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं. वीबोवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही शेअर करण्यात आला आहे. मुलाचा गुण जेव्हा समोर आले तेव्हा वडिलाच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण त्याला केवळ 6 गुण मिळाले.
व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, वडिलाने अनेक रात्री मुलाला शिकवण्यासाठी जागल्या होत्या. आता यूजर्स या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना वडिलाची बाजू घेतली. तर काही लोकांनी मुलाची बाजू घेतली. एकाने कमेंट केली की, त्यांना वडिलांचं दु:खं समजतं. ते एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की, 'पुढे चांगलं करण्याचे आणखीही पर्याय आहेत'.