रातोरात मालामाल झाला व्यक्ती, 2 लाखांची वस्तू 72 कोटींना विकली....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 12:31 PM2022-10-06T12:31:10+5:302022-10-06T12:31:40+5:30

पॉटच्या मालकालाही विश्वास बसला नाही की, या साध्या पॉटसाठी इतकी मोठी रक्कम कुणी कसं देऊ शकतं.

Chinese goods worth lakh rs were sold for 72 crore rupees in auction flower vase | रातोरात मालामाल झाला व्यक्ती, 2 लाखांची वस्तू 72 कोटींना विकली....

रातोरात मालामाल झाला व्यक्ती, 2 लाखांची वस्तू 72 कोटींना विकली....

googlenewsNext

एक चायनीज फुलदानी ज्याची किंमत साधारण दीड लाख रूपये होती. ती 72 कोटी रूपयांना विकली गेली आहे. या पॉटची विक्री फारच अजब पद्धतीने झाली. हा पॉट खरेदी करण्यासाठी 300 ते 400 लोकांनी इंटरेस्ट दाखवला होता. पॉटच्या मालकालाही विश्वास बसला नाही की, या साध्या पॉटसाठी इतकी मोठी रक्कम कुणी कसं देऊ शकतं.

गेल्या शनिवारी पॅरिसच्या Fontainebleau मध्ये ओसेनट ऑक्शन हाउसने या चायनीज फुलदानीचा लिलाव केला. सुरूवातीला याची किंमत दीड ते दोन लाख रूपये मानली जात होती. पण लिलावात ही फुलदानी 72 कोटी रूपयांना विकली गेली.

निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या या फुलदानीला मूळ किंमतीपेक्षा अनेक पटीने जास्त किंमत मिळाली. फूलदानीचं धड गोलाकार आहे. यावर ढग आणि ड्रॅगनचे चित्र आहे. 

ऑक्शन हाउसचे चीफ पियरे म्हणाले की, या लिलावाने त्यांचं जीवन बदललं. ते म्हणाले की, फूलदानीचे मालक परदेशात राहतात. ते त्यांच्या दिवंगत आजीच्या घरून अनेक वस्तू घेऊन आले होते. ज्यात ही फूलदानीही होती. मालकाने त्यांना ही विकण्यास सांगितलं होतं. ज्यानंतर आम्ही याचा लिलाव करण्याचं ठरवलं.

पियरे यांनी सांगितलं की, फूलदानीच्या मालकांची दादी कलेची फॅन होती. साधारण 30 वर्षांपासून त्यांच्याकडे फुलदानी होती. साधारण 300 ते 400 लोकांनी या फूलदानीवर बोली लावली.

पण केवळ यासाठी केवळ 30 लोकांनाच संधी देण्यात आली. एक-एक करून सगळ्यांनी बोली लावली. शेवटी फूलदानी 72 कोटी रूपयांना विकली गेली.

ऑक्शनमध्ये सांगण्यात आलं की, फूलदानी 20व्या शतकातील आहे. हे फुलदानीचं 18व्या शतकातील उत्कृष्ट उदाहरण आहे. पण ही फूलदानी तेवढीही दुर्मिळ नाहीये.

Web Title: Chinese goods worth lakh rs were sold for 72 crore rupees in auction flower vase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.