'या' कालिकामातेच्या मंदिरात दिला जातो चायनीजचा प्रसाद, चिनी भक्तांचा लागतात रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:31 PM2021-08-23T18:31:43+5:302021-08-23T18:40:47+5:30
आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रसाद म्हणून आम्ही तुम्हाला चायनीज नुडल्स आणि पदार्थ दिले तर. तुम्हाला कदाचित पटणार नाही पण भारतातील एका कालिकामातेच्या मंदिरात प्रसाद म्हणून चायनीज दिले जाते. इतकेेच नव्हे तर येथे दर्शन घेण्यासाठी चिनी लोकांच्या रांगा लागतात.
भारत हा देश त्याच्या काही वैशिष्ट्यांसाठी खास प्रसिद्ध आहे. इथल्या संस्कृतीत अशा अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतील ज्यामुळे भारतीय संस्कृती जगभरात वेगळी ठरते. मंदिर म्हटलं की तेथील देवाचं जितकं भक्तांना आकर्षण तितकंच तिथे मिळणाऱ्या प्रसादाचंही. भारतात अशी अनेक मंदिर आहेत जी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रसादासाठी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणी भला मोठा लाडू तर काही ठिकाणी कुरुमुऱ्यांचा प्रसाद. प्रसाद कसाही असो भक्त भक्तीभावाने तो ग्रहण करतो. आता आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रसाद म्हणून आम्ही तुम्हाला चायनीज नुडल्स आणि पदार्थ दिले तर. तुम्हाला कदाचित पटणार नाही पण भारतातील एका कालिकामातेच्या मंदिरात प्रसाद म्हणून चायनीज दिले जाते. इतकेेच नव्हे तर येथे दर्शन घेण्यासाठी चिनी लोकांच्या रांगा लागतात.
कोलकाताच्या टांगरा (चायनाटाउन) परिसरात असलेलं हे चिनी काली मंदिर याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. येथे भक्तांना अनेकदा प्रसाद म्हणून चायनीज नूडल्स, चॉपस्टिक, भात (स्टिकी राईस) किंवा वेगवेगळ्या भाज्या प्रसाद म्हणून दिल्या जातात. तसेच येथे देवीची पूजाही चिनी पद्गतीने केली जाते. देवीच्या चरणी नैवेद्य म्हणूनही चायनीजच अर्पण केलं जात. नैवेद्याव्यतिरिक्त येथे मेणबत्त्या आणि चायनीज अगरबत्ती पेटवण्याची परंपरा आहे.
या मंदिराच्या उभारणीमागची दंतकथा अशी की, एका १० वर्षाच्या चिनी मुलगा आजारी होता व त्याला कोणतंच औषध लागू पडत नव्हतं. तेव्हा त्याच्या वडिलांनी येथे एक दगड ठेवला व त्या दगडाला देवी प्रमाणे हळद कुंकु लावून कालीमाता म्हणून पुजा केली. त्यानंतर त्या मुलाला बरं वाटलं. तेव्हापासून हे हिंदू आणि चिनी संस्कृतीचं प्रतिक असलेलं कालिकामातेच मंदिर येथे आहे.