बाबो! तिखट मिरचीचे मोमोज खाणं पडलं महागात, पोटात झाला स्फोट आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 01:31 PM2020-08-04T13:31:30+5:302020-08-04T13:43:18+5:30
चीनमधील एका व्यक्तीसोबत असंच झालं. या व्यक्तीला चटपटीत मोमोज पाहून कंट्रोल झालं नाही. पण तिखट मिरचीचे मोमोज खाणं त्याला आता आयुष्यभर लक्षात राहणार आहे.
भारतातच काय तर जगभरात खाण्याचे शौकीन लोक असतात. ते त्यांचे आवडीचे पदार्थ खाण्यासाठी काहीही करतात. जिथेही त्यांचे आवडीचे पदार्थ दिसले की, ते तुटून पडतात. पण कधी कधी आपल्या आवडीचे पदार्थ खाणंही महागात पडू शकतं. चीनमधील एका व्यक्तीसोबत असंच झालं. या व्यक्तीला चटपटीत मोमोज पाहून कंट्रोल झालं नाही. पण तिखट मिरचीचे मोमोज खाणं त्याला आता आयुष्यभर लक्षात राहणार आहे.
ही घटना चीनच्या जिंयांग्सू प्रांताती आहे. तिखट मोमोज खाल्ल्याने या व्यक्तीच्या पोटात अचानक विस्फोट झाला आणि त्याच्या आतड्या फाटल्या. गंभीर स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याला वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने आणि वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.
६३ वर्षीय वांग यांनी रात्रीच्या जेवणात तिखट मिरची असलेले मोमोज खाल्लेत. थोड्या वेळाने त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि पोटात छोट्या विस्फोटाचा आवाज आला. त्यांची तब्येत बिघडू लागली. नंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितले की, तिखट मिरची असलेले मोमोज खाल्ल्याने त्यांच्या पोटात वेगाने गॅस तयार झाला. पण आतड्यांमध्ये अन्न फसलं आणि प्रेशर वाढल्यावर ब्लास्ट झाला.
वांग यांनी आधीच पोट आणि पचनासंबंधी समस्या होती. अशात डॉक्टरांनी त्यांना मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नका अशी ताकीद दिली होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. जे त्यांना असं महागात पडलं. त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता. या घटनेवरूनही हेही दिसून येतं की, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
हे पण वाचा :
बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर