बाबो! वॉशिंग मशीन, सोफ्यात लपून करत होते देशाची सीमा पार, पण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 14:08 IST2019-12-12T14:05:47+5:302019-12-12T14:08:53+5:30
एका देशातून दुसऱ्या देशात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात...

बाबो! वॉशिंग मशीन, सोफ्यात लपून करत होते देशाची सीमा पार, पण....
मेक्सिकोमधून दरवर्षी शेकडो लोक अमेरिकेत बेकायदेशीरपणे शिरण्याचा प्रयत्न केला. त्यात काही जागेवर मारले जातात तर काही पकडले जातात. शनिवारीही सॅन डीएगो, कॅलिफोर्नियामध्ये ११ चीनी प्रवासी पकडले गेले. हे सगळेच एका ट्रकमध्ये होते. कुणी वॉशिंग मशीनमध्ये लपले होते, कुणी कपाटात लपले होते, तर कुणी सोफ्यात.
यूएस कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनकडून ही माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, वेगवेगळ्या फर्नीचरमध्ये दडून बसले होते. हे सगळेच San Ysidro Port मधून एन्ट्री घेत होते. या ११ चीनी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यातील कुणीही जखमी झाले नाहीत.
जी व्यक्ती या लोकांना ट्रकमधून घेऊन जात होती, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही व्यक्ती अमेरिकेत राहणारीच आहे. याआधीही नोव्हेंबरमध्ये सहा चीनी नागरिकांना अशाचप्रकारे अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करताना पकडण्यात आले होते.