चीनमध्ये घराघरात पालक लहान मुलांना घालू लागलेत हेल्मेट; कारण ऐकून व्हाल हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 07:47 PM2021-11-08T19:47:23+5:302021-11-08T19:49:22+5:30
सध्या चीनमध्ये एक वेगळाच ट्रेंड सुरू झाला आहे. घराघरात पालक आपल्या लहान मुलांना एक खास हेल्मेट घालण्याची सक्ती करत आहेत.
चीनमध्ये अनेकदा काही अशा घटना आणि बातम्या समोर येतात की ज्या ऐकून किंवा वाचून आश्चर्य व्यक्त केलं जातं. खासकरुन कोरोना विषाणूच्या प्रकोपानंतर संपूर्ण जगाचं लक्ष चीनच्या हालचालींकडे अधिक असतं. सध्या चीनमध्ये एक वेगळाच ट्रेंड सुरू झाला आहे. घराघरात पालक आपल्या लहान मुलांना एक खास हेल्मेट घालण्याची सक्ती करत आहेत.
लहान मुलं आपल्या मर्जीनं घरात हेल्मेट घालून फिरत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीय. मुलांचे पालकच आपल्या मुलांवर हेल्मेट घालण्याची सक्ती करत आहेत. इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार पालकांकडून आपल्या मुलांना संपूर्ण दिवसभर एक खास हेल्मेट परिधान करण्याची सक्ती केली जात आहे. पालक नेमकं असं का करत आहेत असा प्रश्न तुम्हाला पडलं असेल तर यामागचं कारण ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. चीनमध्ये सध्या अशा एका हेल्मेटची जोरदार चर्चा आहे की जे परिधान केल्यानं लहानमुलांच्या डोक्याचा आकार सुरेख राखला जातो. त्यामुळे आपल्या चिमुकल्याचं डोकं गोलाकार आकाराचं आणि सुयोग्य असावं यासाठी पालक या खाल हेल्मेटची खरेदी करत आहेत.
चीनमध्ये तर आता लहान मुलांना हे खास हेल्मेट घालण्याचा नवा ट्रेंडच सुरू झाला आहे. लहान मुलांच्या डोक्याचा आकार सुयोग्य राखण्यात हे हेल्मेट मदत करतं असा दावा केला जात आहे. पण दुसरीकडे या हेल्मेट सक्तीमुळे मुलांना त्रास होत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
नव्या ट्रेंडमुळे कंपन्यांची मात्र चांगलीच दिवाळी झाली आहे. हेड करेक्शनसाठी तयार करण्यात आलेल्या या हेल्मेटचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. मुलांच्या डोक्याचा आकार चपटा राहू नये यासाठी पालक हे हेल्मेट विकत घेत आहेत.
३ लाख रुपये आहे एका हेल्मेटची किंमत!
विशेष बाब म्हणजे या खास हेल्मेटची किंमत तब्बल ३ लाख रुपये इतकी आहे. याचं एक स्वस्तातलं व्हर्जन देखील बाजारात उपलब्ध आहे. बहुतांश महिला आपल्या मुलींसाठी या हेल्मेटची खरेदी करत असल्याचं दिसून आलं आहे. बाळ ३ महिन्यांचं झालं की हे हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली जाते आणि महिनाभरानंतर याचे परिणाम दिसू लागतात असा दावा कंपनीनं केला आहे.