ऐकावं ते नवलच! समुद्र किनाऱ्यावर मेसेज लिहिते 'ही' महिला; महिन्याला कमावते तब्बल 1 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 02:23 PM2023-01-09T14:23:47+5:302023-01-09T14:28:01+5:30

नोकरी सोडून एक अजब गोष्ट सुरू केली आहे, ज्यातून ती महिन्याला एक लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहे.

chinese woman feng job draw messages on beaches earn 1 lakh rupee month | ऐकावं ते नवलच! समुद्र किनाऱ्यावर मेसेज लिहिते 'ही' महिला; महिन्याला कमावते तब्बल 1 लाख

फोटो - Weibo

googlenewsNext

जगभरातील देश वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहेत. काही देश वाढत्या महागाई आणि मंदीशी झुंजत आहेत, तर काही अजूनही कोरोनाच्या प्रभावातून सावरत आहेत. अशा परिस्थितीत जीवन जगण्यासाठी नोकरी मिळणे कठीण आहे. मात्र, असे काही लोक आहेत जे अशा वेळी आपली हौस पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडतात. चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेनेही असेच काहीसे केले आहे. तिने नोकरी सोडून एक अजब गोष्ट सुरू केली आहे, ज्यातून ती महिन्याला एक लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहे.

फेंग नावाची ही चिनी महिला सेल्स सेक्टरमध्ये काम करायची. पण नंतर तिने नोकरी सोडली आणि एक अतिशय मनोरंजक व्यवसाय सुरू केला, ज्यामध्ये तिला आता समुद्र किनाऱ्यांवर मेसेज लिहावे लागतात. या कामासाठी फेंगला तगडा पगारही मिळतो. आता फेंग समुद्र किनाऱ्यांवर इतर लोकांसाठी खास मेसेज लिहिण्याचे काम करते. ही नोकरी केवळ मजेशीरच नाही, तर त्यात भरघोस पगारही मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. फेंग हा चीनमधील हैनान भागातील सानया शहरातील रहिवासी आहे.

हे काम कसे सुरू झाले?

खरंतर फेंगला या कामाबद्दल तेव्हाच कळालं जेव्हा त्याने एका व्यक्तीला वाळूवर मेसेज लिहिताना पाहिलं. यानंतर तिची त्यात आवड वाढली आणि तिने सेल्सची नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फेंगने समुद्रकिनाऱ्यांवर मेसेज लिहिणे आणि ते सोशल मीडियावर अपलोड करणे सुरू केले. पण यातून यश मिळेल, अशी तिला अपेक्षा नव्हती.

महिन्याला कमावते तब्बल 1 लाख  

वाळूच्या काठावर केलेली कलाकृती लोकांना खूप आवडली. याचा परिणाम असा झाला की लवकरच तिला मेसेज लिहिण्यासाठी बुकिंग मिळू लागले. एक वेळ अशी आली जेव्हा तिने पूर्णपणे वाळूवर मेसेज लिहायचे ठरवले. तिने धाडसी निर्णय घेतला आणि आपली आवड निवडली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, फेंगने सांगितले की, ती आठ तास काम करून दर महिन्याला 10000 युआन (सुमारे 1.2 लाख रुपये) कमावते. तिने सांगितले की इतर लोकांसाठी मेसेज लिहून तिला खूप आनंद होतो, कारण जेव्हा कोणी तो मेसेज वाचतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू येते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: chinese woman feng job draw messages on beaches earn 1 lakh rupee month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.