तरूणाने तरूणीला दिली अशी झप्पी, मोडली छातीची तीन हाडे; केस करून मागितले इतके लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:06 PM2022-08-18T12:06:07+5:302022-08-18T12:08:30+5:30

China : ही घटना चीनची आहे आणि चीनी महिलेने आपल्या सहकाऱ्यावर केस ठोकली आहे. कथितपणे तिच्या सहकाऱ्याने तिला फार जोरात मिठी मारली. ज्यामुळे तिच्या छातीची हाडं मोडली. या महिलेने आता दंड भरपाईची मागणी केली आहे.

Chinese woman sued her coworker after he broke three of her ribs by hugging too tightly | तरूणाने तरूणीला दिली अशी झप्पी, मोडली छातीची तीन हाडे; केस करून मागितले इतके लाख रूपये

तरूणाने तरूणीला दिली अशी झप्पी, मोडली छातीची तीन हाडे; केस करून मागितले इतके लाख रूपये

googlenewsNext

Rib Crushing hug:  'मुन्ना भाई एमबीबीएस' सिनेमात तुम्ही जादू की झप्पी हा डायलॉग तर ऐकला असेलच. असं मानलं जातं की, जर तुम्ही कुणाला प्रेमाने मिठी मारली तर समोरच्या व्यक्तीला मोठा दिलासा मिळतो. पण एक अशी घटना समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीने महिलेला इतक्या जोरात मिठी मारली की, तिच्या छातीचे हाडं मोडली. ही घटना चीनची आहे आणि चीनी महिलेने आपल्या सहकाऱ्यावर केस ठोकली आहे. कथितपणे तिच्या सहकाऱ्याने तिला फार जोरात मिठी मारली. ज्यामुळे तिच्या छातीची हाडं मोडली. या महिलेने आता दंड भरपाईची मागणी केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना मे 2021 मध्ये घडली होती. चीनच्या हुनान प्रांतातील यूयांग शहरातील महिला तिच्या ऑफिसमध्ये तिच्या एका सहकाऱ्यासोबत बोलत होती. तेव्हाच एक दुसरा पुरूष सहकारी तिच्याजवळ आला आणि त्याने जोरात तिला मिठी मारली. महिला कथितपणे मिठी मारल्यानंतर वेदनेने ओरडत होती. आयओएलनुसार, कामानंतरही तिला छातीत वेदना जाणवत होती. तिने डॉक्टरकडे जाण्याऐवजी छातीवर गरम तेल लावलं आणि झोपली. छातीत वेदना वाढल्यानंतर पाच दिवसांनी ती हॉस्पिटलमध्ये गेली.

एक्स-रे स्कॅननुसार, महिलेच्या तीन पासोळ्या तुटल्या होत्या. तिला पैसेही गमवावे लागले कारण ती ऑफिसला गेली नाही. त्याची तिला जबरदस्तीने सुट्टी घ्यावी लागली. तिला नर्सिंग सेवा आणि चिकित्सेसाठीही पैसे द्यावे लागले होते. उपचारादरम्यान ती त्या व्यक्तीकडे गेली ज्याच्यामुळे तिची हाडे मोडली. त्याच्यासोबत करार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत वाद केला. पण तिच्याकडे काहीच पुरावा नाही की, त्याच्यामुळे हे सगळं झालं.

काही दिवसांनंतर महिलेने आपल्या सहकाऱ्यावर नुकसान भऱपाईसाठी केस ठोकली. न्यायाधीशांनी सहकाऱ्याला 10 हजार युआन म्हणजे 1.16 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. कोर्टाने सांगितलं की, हे सिद्ध करण्यासाठी कोणताच पुरावा नाही की, महिलेने पाच दिवसादरम्यान कोणत्या गोष्टींमध्ये सहभाग घेतला. ज्यामुळे तिची हाडे मोडली.

Web Title: Chinese woman sued her coworker after he broke three of her ribs by hugging too tightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.