Christmas 2018: जाणून घ्या ख्रिसमस ट्रीबाबत रोमांचक गोष्टी, कशी झाली सुरुवात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:16 PM2018-12-24T15:16:53+5:302018-12-24T15:24:35+5:30

25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन लोक आपल्या घरांना सजवतात आणि ख्रिसमस ट्री आपल्या घरात लावतात.

Christmas 2018: Interesting facts you need to know about Christmas tree | Christmas 2018: जाणून घ्या ख्रिसमस ट्रीबाबत रोमांचक गोष्टी, कशी झाली सुरुवात?

Christmas 2018: जाणून घ्या ख्रिसमस ट्रीबाबत रोमांचक गोष्टी, कशी झाली सुरुवात?

googlenewsNext

(Image Credit : Christmas Tree World)

25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी ख्रिश्चन लोक आपल्या घरांना सजवतात आणि ख्रिसमस ट्री आपल्या घरात लावतात. ख्रिसमस ट्री लावला जातो, त्यावर गिफ्ट लावले जातात, हे सर्वांनाच माहीत असेल. पण काय तुम्हाला ख्रिसमस ट्री ची परंपरा माहीत आहे? चला जाणून जाणून घेऊ ख्रिसमस ट्री चा इतिहास आणि त्याच्याशी निगडीत काही रोचक गोष्टी...

ख्रिश्चन धर्माआधीचा इतिहास

हिस्ट्री डॉट कॉम या चॅनलनुसार, ख्रिश्चन धर्म अस्तित्वात येण्याआधीपासूनच नेहमी हिरव्या राहणाऱ्या झाडांना लोकांच्या जीवनात महत्त्व होतं. या झाडांच्या फांद्यांनी लोक आपलं घर सजवत असत. यामागे त्यांचा असा समज होता की, असे केल्याने जादू-टोन्याचा प्रभाव होत नाही. भूत-प्रेत, आत्मा आणि आजारही यामुळे दूर राहतात. प्राचीन इजिप्त आणि रोममधील लोक हिरव्या झाडांच्या शक्तीवर आणि सुंदरतेवर विश्वास ठेवत असत.

सेंट बोनीफेस 

ख्रिसमस ट्रीबाबतची एक आख्यायिका ७२२ ईसवीती आहे. अशी मान्यता आहे की, जर्मनीचे सेंट बोनीफेस यांना खबर लागली होती की, काही दृष्ट लोक एका विशाल ओक ट्री खाली एका लहान मुलाचा बळी देणार आहेत. सेंट बोनिफेस यांनी त्या मुलाला वाचवण्यासाठी ओट ट्री कापलं. याच कापलेल्या ओक ट्रीच्या मुळातून एका सनोबरचं झाड उगवलं. त्यानंतर सेंट बोनिफेस यांनी लोकांना सांगितलं की, हे पवित्र झाड आहे. त्यांनी सांगितले की, झाडाच्या फांद्या स्वर्गाकडे संकेत करत आहेत. तेव्हापासून या झाडाबाबत लोकांच्या मनात सन्मान निर्माण झाला.  

जर्मनीला श्रेय

तसा जर्मनीला ख्रिसमस ट्री ची परंपरा सुरु करण्याचं श्रेय दिलं जातं. अनेकजण याचा संबंध ख्रिश्चन धर्माचे महान सुधारक मार्टिन लूथर यांच्याशीही जोडतात. पण याचा काही पुरावा नाहीये. या आख्यायिकेनुसार, साधारण १५०० ईसवीमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला बर्फाने झाकलेल्या एका जंगलातून जात होते. त्यांनी बर्फाने चमकत्या झाडाला पाहिले. झाडाच्या फांद्या बर्फाने झाकल्या होत्या आणि चंद्राच्या प्रकाशाने त्या चमकत होत्या. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी अंगणात सनोबरचं एक झाड लावलं. हे झाड त्यांनी कॅन्डलने सजवलं. हे झाड त्यांनी येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसाच्या सन्मानार्थ समोर आणलं होतं. तेव्हापासूनच ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरु झाली. 

अमेरिकेत ख्रिसमस ट्री

अमेरिकेतही ख्रिसमस ट्रीचा संबंध जर्मनीशी आहे. अमेरिकेत याचा इतिहास १८३० मध्ये मिळतो. जेव्हा जर्मनीचे लोक अमेरिकेत आले तेव्हा ते ती परंपरा सोबत घेऊन आले. अमेरिकेतील पेनिसिल्वानियामध्ये सर्वात पहिले ख्रिसमस ट्री ची परंपरा सुरु झाली. 

इंग्लंडमध्ये ख्रिसमस ट्री

इंग्लंडमध्ये ख्रिसमस ट्री ची परंपरा जर्मनीच्या मार्गेच आले आहेत. इंग्लंडमध्ये हे पसरवण्याचं श्रेय क्वीन व्हिक्टोरियाचे पती प्रिन्स अल्बर्ट यांना जातं. प्रिन्स अल्बर्ट जर्मनीचे राहणारे होते. १८४८ मध्ये त्यांनी विंडसर कॅसलमध्ये पहिलं ख्रिसमस ट्री लावला होता. तेव्हापासून संपूर्ण इंग्लंडमध्ये ख्रिसमस ट्री ची परंपरा कायम आहे. 

१८५१ मध्ये ख्रिसमस ट्री चं मार्केटिंग

ख्रिसमस ट्री च्या मार्केटिंगचं श्रेय हे न्यू यॉर्कच्या एका व्यापाऱ्याला जातं. त्याने त्याच्या बागेतील अनेक झाडे कापली आणि न्यूयॉर्कमधील वॉशिंग्टन मार्केटमध्ये विकण्यासाठी पाठवले. तेव्हापासून ख्रिसमस ट्री ची विक्री सुरु झाली. 

झाडाची सजावट

जर्मनीतून आलेले अमेरिकन लोक हे झाडाला सजवण्यासाठी सफरचंद, नट आणि मारपिजन कूकीचा वापर करत होते. तर इतर अमेरिकन घरगुती वस्तूंचा वापर करत होते.
 

Web Title: Christmas 2018: Interesting facts you need to know about Christmas tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.