थेट राजाच्या घरातच मोठी चोरी; 'ती' पाच कोटी रूपयांची घड्याळं घेऊन पसार आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 02:49 PM2020-01-27T14:49:20+5:302020-01-27T15:04:54+5:30
ही चोरी एका ४६ वर्षीय महिलेनेच केली आहे. ती राजाच्या घरात साफसफाईचं काम करत होती.
(Image Credit : frugalentrepreneur.com)(सांकेतिक छायाचित्र)
मोरक्कोचा राजा किंग मोहम्मद VI च्या घरी चोरी झाली असून महिला चोराने त्यांच्या घरातील ३६ किंमती घड्याळं लांबवली आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, या सर्वच घड्याळांची किंमत ५ कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.
साफ-सफाई करणाऱ्या महिलेनेच केली चोरी
ही चोरी एका ४६ वर्षीय महिलेनेच केली आहे. ती राजाच्या घरात साफसफाईचं काम करत होती. शनिवारी या महिलेला कोर्टात हजर करण्यात आलं आणि तिला शिक्षा सुनावण्यात आली. तिला १५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे.
(Image Credit : saudigazette.com.sa)
या महिलेसोबतच १४ इतर लोकांचाही यात समावेश होता. त्यांनाही शिक्षा झाली आहे तर ज्या सोनारांना या ही घड्याळे विकण्यात आलीत त्यांनाही ४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
या चोरीतून मिळालेल्या पैशांतून एका व्यक्तीने तर गोल्फ कार खरेदी केली. या कारची किंमत १२००० यूरो सांगितली जात आहे. भारतीय करन्सीनुसार ही किंमत ९ लाख रूपये इतकी होती. इतकेच नाही तर त्याने तिच्या बहिणीच्या नावाने एक फ्लॅटही खरेदी केला.
दरम्यान, मोरक्कोच्या राजाचं नाव जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांमध्ये घेतलं जातं. त्यांना महागड्या घड्याळांची आवड आहे. २०१४ मध्ये फोर्ब्स मॅगझीनने त्यांच्या नावाचा समावेश जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांमध्ये केला होता.