Bleach की Baking Soda, पांढरे कपडे चमकवण्यासाठी काय आहे बेस्ट; कशाने कपडे होतील सॉफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:42 PM2022-06-27T13:42:30+5:302022-06-27T13:43:54+5:30

Cleaning Hacks : पांढऱ्या कपड्यांची स्वच्छता करताना याचीही काळजी घ्यावी लागते की, यावर नीळ, पाणी किंवा ब्लीचचे डाग लागू नये किंवा कपडा पिवळा दिसू नये. या सर्व समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहोत. 

Cleaning Hacks : Bleach vs Baking Soda to Clean White Clothes | Bleach की Baking Soda, पांढरे कपडे चमकवण्यासाठी काय आहे बेस्ट; कशाने कपडे होतील सॉफ्ट

Bleach की Baking Soda, पांढरे कपडे चमकवण्यासाठी काय आहे बेस्ट; कशाने कपडे होतील सॉफ्ट

googlenewsNext

Cleaning Hacks : नेहमीच पांढरे कपडे धुण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी हळदीचे, कधी घामाचे, कधी जखमांचे डाग पांढऱ्या कपड्यांवर चिकटून बसतात. हे डाग दूर करणं म्हणजे सोपं काम नाही. तेच पांढऱ्या कॉलरवर लागलेले डाग किंवा भाज्याचे पिवळे डाग अनेकदा लाजिरवाण्या क्षणांचंही कारण ठरतात. पण पांढऱ्या कपड्यांची स्वच्छता करताना याचीही काळजी घ्यावी लागते की, यावर नीळ, पाणी किंवा ब्लीचचे डाग लागू नये किंवा कपडा पिवळा दिसू नये. या सर्व समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही उपाय घेऊन आलो आहोत. 

बेकिंग सोडा

पांढरे कपडे योग्यपणे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ते बेकिंग सोड्याच्या पाण्यात बुडवू शकता. हे मिश्रण तयार करण्यासाठी जवळपास 4 लीटर पाण्यात एक कप बेकिंग सोडा टाका आणि पाणी चांगल्या प्रकारे मिश्रित करा. आता या पाण्यात पांढरे कपडे टाका आणि त्यानंतर कपडे धुवा. पांढरे कपडे चमकदार दिसतील. हे कपडे धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.

बेकिंग सोड्याचे अनेक काही उपाय आहेत. सोडा लिंबूसोबत मिश्रित करून कपड्यांवरून हट्टी डाग दूर करण्यासाठी वापर करू शकता. तेच स्पॉट क्लीन करण्यासाठी डाग असलेल्या जागेवर काही वेळासाठी बेकिंग सोडा लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या.

ब्लीचनेही होईल फायदा

पांढरे कपडे ब्लीचने स्वच्छ करण्यासाठी बकेटीत थंड पाणी घ्या. आता या पाण्यात पांढरे कपडे पूर्णपणे बुडवा. यानंतर या पाण्यात गरजेनुसार ब्लीचच्या पॅकेटवर निर्देशानुसार ब्लीच मिश्रित करा. जर कपड्यांवरील हट्टी डाग दूर करण्यासाठी तुम्ही कपड्यांवर स्पॉट क्लीनही करू शकता. काळजी घ्या की, पांढऱ्या कपड्यांसोबत रंगीत कपडे टाकू नये. असं केलं तर त्यावर रंगीत डाग लागतील.

कोणता उपाय जास्त चांगला

बेकिंग सोडा आणि ब्लीचचा वापर करून तुम्ही पांढऱ्या कपड्यांवरील डाग कसे दूर कराल हे तर तुम्हाला समजलं असेलच. आता हे जाणून घ्या की, या दोनपैकी कोणता उपाय जास्त फायदेशीर ठरतो.

बेकिंग सोडा कपडे स्वच्छ करण्यासोबतच त्यातून येणारी दुर्गंधीही दूर करते. याने कपडे मुलायम होतात आणि डिर्टजेंट पावडरचा प्रभावही वाढवतात. त्यासोबतच बेकिंग सोडाचं पाणी वॉशिंग मशीनमध्ये टाकलं तर मशीनचीही स्वच्छता होते.

क्लोरिन ब्लीचबाबत सांगायचं ब्लीचमुळे पांढरे कपडे तर स्वच्छ होतात, पण योग्यप्रकारे वापर केला नाही तर याने कपड्यांचं नुकसानही होतं. खासकरून उलन, सिल्क आणि लेदरच्या कपड्यांना ब्लीचपासून दूरच ठेवा.
 

Web Title: Cleaning Hacks : Bleach vs Baking Soda to Clean White Clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.