वाह रे नशीब! २० वर्षांपासून बिल्डींगमध्ये साफसफाई करायची; अन् एकेदिवशी घरच गिफ्ट मिळालं
By manali.bagul | Published: January 25, 2021 01:10 PM2021-01-25T13:10:26+5:302021-01-25T13:35:38+5:30
गेल्या २० वर्षांपासून एक महिला सफाईचं काम करत आहे. कोरोनाकाळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता.
कोरोनाकाळात समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये झालेला बदल दिसून आला. काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच जास्तवेळ आपल्या कुटुंबियांना दिला. पण काही लोकांच्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नाही. कोरोनाकाळातही आपल्या कर्तव्यावर हजर राहून त्यांनी लोकांची सेवा केली. जगभरात याच लोकांना कोरोना वॉरियर्स म्हटलं जात आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कोरोना योद्ध्याबाबत सांगणार आहोत.
गेल्या २० वर्षांपासून एक महिला सफाईचं काम करत आहे. कोरोनाकाळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. रोजा या न्यूयॉर्कमध्ये त्या एका लग्जरीअस अपार्टमेंटची साफ सफाई करतात. सफाई करता करता त्यांना एक नव कोरं घर गिफ्ट मिळालं आहे.
'असं' मिळालं नवीन घर
इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार या महिलेला अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका शहरात चार बेडरूम आणि तीन बाथरूमचे घर देण्यात आले आहे. कोरोनाकाळात ही महिला दिवसरात्र इमारत स्वच्छ करण्याचे काम करत होती, म्हणून तिला घर देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसात या महिलेची आर्थिक स्थितीही फारशी चांगली नव्हती. या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला लिफ्टजवळ उभी राहते. तिला वाटतं की साफसफाई करायला बोलावलं आहे. पण मालक तिला एक घर गिफ्ट करतो. हा अनपेक्षित प्रकार पाहून सुरूवातीला या महिलेला काही सुचेनासे होते. वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी
महिलेला आनंदाश्रू आले
घरं गिफ्ट केल्याचे सांगितल्यानंतर रोजाला अश्रू अनावर झाले. 'या ठिकाणी दोन वर्षांसाठी आपल्या कुटुंबासोबत राहू शकते.' असं मालकानं त्यांना सांगितले. हे ऐकताच रोजाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सगळ्यांसाठी रोजा एका सेलिब्रिटीप्रमाणे आहे. प्रत्येक प्रसंगात चेहऱ्यावर आनंद ठेवून त्या आपलं काम करतात. ..म्हणून भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती