अद्भूत! नागालॅंडच्या डोंगरांमध्ये ३७०० मीटर उंचीवर दिसला दुर्मीळ 'क्लाउडेड बिबट्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 01:43 PM2022-01-08T13:43:02+5:302022-01-08T13:47:02+5:30

Clouded Leopard : हा क्लाउडेड बिबट्या भारत-म्यांमार सीमेवर जवळपास ३७०० मीटर उंचीवर आढळून आला. कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने या बिबट्याचे फोटो काढण्यात आले.

Clouded leopard spotted in Nagaland at 3700 meter height | अद्भूत! नागालॅंडच्या डोंगरांमध्ये ३७०० मीटर उंचीवर दिसला दुर्मीळ 'क्लाउडेड बिबट्या'

अद्भूत! नागालॅंडच्या डोंगरांमध्ये ३७०० मीटर उंचीवर दिसला दुर्मीळ 'क्लाउडेड बिबट्या'

googlenewsNext

नागालॅंडच्या कम्युनिटी फॉरेस्टमध्ये एका टीमने क्लाउडेड बिबट्याला (Clouded Leopard) शोधलं आहे. The Indian Express च्या एका रिपोर्टनुसार, क्लाउडेड बिबट्या झाडावर सहजपणे चढू शकतो आणि लार्ज वाइल्ड कॅट्समध्ये सर्वात लहान आहे. याला IUCN Red List of Threatened Species च्या वल्नरेबल कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे.

हा क्लाउडेड बिबट्या भारत-म्यांमार सीमेवर जवळपास ३७०० मीटर उंचीवर आढळून आला. कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने या बिबट्याचे फोटो काढण्यात आले. भारतात एखाद्या क्लाउडेड बिबट्याला इतक्या उंचीवर कधीही बघण्यात आलं नाही. दिल्लीच्या वाइल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या टीमने आणि थानामीर गावाने मिळून हा बिबट्या शोधला. कम्युनिटी जंगलात ५० पेक्षा अधिक कॅमेरा ट्रॅप लावले आणि फोटो कैद केले. 

एका रिपोर्ट जारी करून सांगण्यात आलं की, 'नागालॅंडमधील स्थानिक निवासी क्षेत्राच्या जंगलाच्या एका मोठ्या भागाचे मालक आहेत आणि या जंगलाची ते देखरेख करतात. जंगलाची देखरेख करण्यासाठी ग्रामीण लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. सर्वेतून समोर आलं की, या भागात अनेक प्रकारचे वल्नरेबल जीव राहतात.

देशाच्या कायद्यानुसार वन्य जीवांचं संरक्षण केलं जातं. पण उत्तर-पूर्व राज्यातील स्थानिक रहिवाशीच जंगलाचं आणि जीव-जंतुचं संरक्षण करतात. ग्रामीण जंगलांचा वापर करतो आणि बायोडायव्हर्सिटीचं रक्षण करतात.

या भागात एशियाटीक ब्लॅक बेअर, यलो थ्रोटेड मार्टेन, स्टम्प टेल्ड मकाऊं, असेमीज मकाऊ आणि एशियाटीक गोल्डन कॅट, मार्बल्ड कॅट आणि लेपर्ड कॅट यांचेही फोटो काढण्यात आले आहेत.
 

Web Title: Clouded leopard spotted in Nagaland at 3700 meter height

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.