पोरानं रागात घेतला नागाचा २-३ वेळा चावा; साप तडफडून मेला, डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 05:18 PM2022-11-05T17:18:26+5:302022-11-05T17:23:28+5:30

ही पहिलीच वेळ आहे की, विषारी नाग कोब्रा मुलाला चावला आणि उपचारादरम्यान तो वाचला.

Cobra bites 8-year-old Chhattisgarh boy, he bites it back twice, snake dies | पोरानं रागात घेतला नागाचा २-३ वेळा चावा; साप तडफडून मेला, डॉक्टर म्हणाले...

पोरानं रागात घेतला नागाचा २-३ वेळा चावा; साप तडफडून मेला, डॉक्टर म्हणाले...

googlenewsNext

जशपूर जिल्ह्यातील तपकरासह इतर भागात सर्पदंशाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दरवर्षी येथे १२ हून अधिक आदिवासींचा सर्पदंशाने मृत्यू होतो. मात्र यावेळी आदिवासी भागातील गार्डन तालुक्यात असलेल्या पंडरापथ गावात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. इकडे घरात खेळत असलेल्या एका मुलाला कोब्रा साप चावला, वेदनेने रडत असताना त्या मुलालाही राग आला आणि त्याने त्याच सापाला पकडून २-३ ठिकाणी दातांनी चावा घेतला. आश्चर्य म्हणजे उपचारानंतर ८ वर्षांचा निष्पाप वाचला, मात्र कोब्रा सापाचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे ज्या मुलाला साप चावला आहे, तो छत्तीसगडमधील लुप्त होत चाललेल्या कोरवा जमातीतील आहे. या जमातीचे लोक राष्ट्रपतींचे दत्तक पुत्रही मानले जातात. ही प्रजाती वाचवण्यासाठी सरकार दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून परत आलेला ८ वर्षीय दीपक म्हणाला, मी माझ्या बहिणीसोबत अंगणात खेळत असताना अचानक मागून एक साप आला आणि माझ्या पाठीवर चढला. जेव्हा मला साप चावला तेव्हा त्याचा खूप राग आला, मी पळून जाणाऱ्या सापाला पकडले आणि दाताने चावा घेतला. 

आई बहिणीनं रुग्णालयात नेले...
त्यानंतर लगेचच दीपकने आपल्या बहिणीला त्याला साप चावल्याचं सांगितले, त्यानंतर आई आणि बहिणीने त्याला रुग्णालयात नेले. आपल्या मुलाला साप चावला होता आणि मुलानेही रागाच्या भरात त्याच सापाला चावला असल्याचं आईने सांगितले. दीपकची बहीणही सांगते की, माझा भाऊ माझ्याकडे धावत आला आणि मला साप चावल्याचं सांगितले. मग आई आणि आम्ही मिळून त्याला दवाखान्यात नेले. ही पहिलीच वेळ आहे की, विषारी नाग कोब्रा मुलाला चावला आणि उपचारादरम्यान तो वाचला. मात्र मुलाच्या चाव्यामुळे सापाचा मृत्यू झाला. 

सर्प तज्ज्ञांना काय वाटतं?
या आश्चर्यकारक घटनेबाबत जशपूर जिल्ह्यातील सर्प तज्ज्ञ डॉ. केसर हुसेन यांनी सांगितले की, साप चावल्यावर त्याचे विष शरीरात सोडतो, परंतु या प्रकरणात सापाने मुलाला चावल्यानंतर त्याचे विष शक्यतो सोडले नाही अशा वेळी सर्पदंशाचा जीव वाचतो आणि त्यावर उपचाराने जीव वाचला असं काही लोकांचे मत आहे. सत्य हे आहे की साप चावला, पण त्याने विष सोडले नाही असं त्यांनी सांगितले. या घटनेनं जशपूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरली आहे. कोब्रासारख्या विषारी सापाने चावा घेतल्यानंतर मुलाला काहीही झाले नाही, परंतु जेव्हा मुलाने सापाला चावलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला. हा देवाचा चमत्कार मानून आदिवासी भागातील लोक दूरदूरवरून त्या बालकाला पाहायला येत आहेत.

दुखापतीमुळे साप मरण पावला
त्याचवेळी जशपूर जिल्ह्यातील डॉ. लक्ष्मीकांत बापट सांगतात की, दीपकला जेव्हा साप चावला, तेव्हा त्याला विषरोधी इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले. पण त्याने ज्या सापाला चावलं त्याचा मृत्यू जखमी होऊन झाल्याचं डॉक्टर म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Cobra bites 8-year-old Chhattisgarh boy, he bites it back twice, snake dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.