ऐकावं ते नवलच! कोंबड्यावर आहे मालकाच्या हत्येचा आरोप, न्यायालयातही व्हावं लागणार हजर; जाणून घ्या नेमकं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 01:08 PM2021-02-28T13:08:26+5:302021-02-28T13:12:14+5:30

Cock in Custody in Case of Owners Murder : एखाद्या कोंबड्यावर कायदेशीर प्रक्रिया होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीतही दोन कोंबड्यांना 10 लोकांसह तीन दिवस जेलमध्ये ठेवलं गेलं होतं.

cock in custody in case of owners murder may be produced in court | ऐकावं ते नवलच! कोंबड्यावर आहे मालकाच्या हत्येचा आरोप, न्यायालयातही व्हावं लागणार हजर; जाणून घ्या नेमकं प्रकरण

ऐकावं ते नवलच! कोंबड्यावर आहे मालकाच्या हत्येचा आरोप, न्यायालयातही व्हावं लागणार हजर; जाणून घ्या नेमकं प्रकरण

googlenewsNext

नवी दिल्ली - तेलंगणामध्ये एका कोंबड्याला (Rooster) आपल्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकते. जगतियाल जिल्ह्यातील गोलापल्लीमध्ये हा अजब प्रकार समोर आला आहे. सध्या या कोंबड्याला पोलिसांच्या ताब्यात (Police Custody) ठेवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर या गुन्ह्यामुळे त्याला चक्क न्यायालयात हजरही व्हावं लागणार आहे. एखाद्या कोंबड्यावर कायदेशीर प्रक्रिया होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीतही दोन कोंबड्यांना 10 लोकांसह तीन दिवस जेलमध्ये ठेवलं गेलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. गोलापल्लीमध्ये मंदिराजवळ कोंबड्यांची झुंज होणार होती. याचसाठी पोल्ट्री चालवणारे 45 वर्षाचे टी सतैयादेखील तयारी करत होते. अशा झुंजीसाठी कोंबड्यांना तयार करण्यात ते माहिर असल्याचं म्हटलं जातं. सकाळी ते कामावर आले आणि कोंबड्याच्या पायात 3 इंचाचा चाकू बांधला. त्यांनी पहिल्या कोंबड्याला खाली ठेवून दुसऱ्याला हातात घेण्याचा प्रयत्न करताच तो चाकू खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागला. याच दरम्यान चुकून हा चाकू सतैया यांच्या कमरेला लागला.

गोलापल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतैया यांच्या शरीरातून खूप रक्त येऊ लागलं. रुग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चाकू आणि जप्त केलेल्या कोंबड्याचे फोटोही घेतले गेले आहेत. आम्ही दोन दिवस या कोंबड्याला पोलीस ठाण्यात ठेवलं. मात्र, नंतर त्याला जवळच्याच एका पोल्ट्री फार्ममध्ये पाठवलं. न्यायालयाने आदेश दिल्यास त्याला न्यायालयात हजर केलं जाईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

सतैया यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अशा झुंजीमध्ये ते नेहमीच भाग घ्यायचे. प्रत्येक झुंजीचे त्यांना 1500 ते 2000 रुपये मिळायचे. तेलंगणामध्ये कोंबड्याची अशी झुंज लावणे हे अवैध आहे. मात्र, अनेक ठिकाणी गुपचूप आजही याचं आयोजन केलं जातं. या लढाईमध्ये एका दोन कोंबड्यांना एकामेकांसमोर लढाईसाठी सोडलं जातं. त्यांच्यावर लाखो रुपयांची पैज लावली जाते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: cock in custody in case of owners murder may be produced in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस