पाणघोड्यांच्या नसबंदीसाठी लाखो खर्च करत आहे सरकार, ड्रग माफियासोबत आहे कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 01:17 PM2023-11-24T13:17:58+5:302023-11-24T13:20:15+5:30
आता त्यांची संख्या 100 पेक्षा जास्त झाली आहे. ज्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
सध्या कोलंबिया एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. इथे पाणघोडे आणि त्यांची नसबंदी चर्चेत आहे. 1980 मध्ये ड्रग माफिया पाब्लो एस्कोबार याने पाणघोडे बेकायदेशीर मार्गाने देशात आणले होते. हे पाणघोडे एस्कोबारच्या प्रॉपर्टीच्या जवळ असलेल्या नदीत वाढले. आता त्यांची संख्या 100 पेक्षा जास्त झाली आहे. ज्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. कोलंबिया सरकार यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्लान करत आहे.
कोलंबियातील पर्यावरण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन नर पाणघोडे आणि एक मादाची नसबंदी करण्यात आली आहे. सरकारची योजना दरवर्षी 40 पाणघोड्यांची नसबंदी करण्याची आहे. त्यानंतर काही इतर देशात स्थलांतरित केले जातील आणि काहींना इच्छामृत्यु देण्याची योजना आहे. कोलंबिया द्वारे अचानक हा निर्णय घेण्यात आला. याचं कारणही रोचक आहे.
असं सांगण्यात येत आहे की, कोलंबिया एक असा देश आहे जिथे पाणघोड्यांचे कुणी नैसर्गिक शिकारी नाहीत. ज्यामुळे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या देशात पाणघोड्यांना एक आक्रामक प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
योजनेचे प्रभारी डेविड एचेवेरी लोपेज म्हणाले की, नसबंदी करायला वेळ लागतो. कारण तीन टन वजन असलेल्या या प्राण्यांना पकडणं काही सोपं काम नाही. सोबतच इथे पाऊस खूप जास्त होत आहे. पावसामुळे गवत आणि इतर वनस्पीत वाढत आहे. ज्यामुळे त्यांना भरपूर खाद्य मिळतं. त्यांना खाद्याचं आमिष देऊनही पकडता येत नाही.
दरम्यान 1980 मध्ये काही पाणघोडे एस्कोबारच्या खाजगी प्राणी संग्रहालयात म्हणजे हेसिंडा नेपोल्समध्ये आणण्यात आले होते. जे 1993 मध्ये त्याच्या मृत्युनंतर लोकांचं आकर्षण ठरले होते. जास्तीत जास्त प्राणी नदीत स्वतंत्र राहतात आणि कोणत्याही नियंत्रणाशिवाय प्रजनन करतात. सरकारचा अंदाज आहे की, कोलंबियामध्ये सध्या 169 पाणघोडे आहेत. जर यांची संख्या नियंत्रित केली नाही तर 2035 पर्यंत यांची संख्या 1000 होऊ शकते.
कोलंबियासारख्या देशात अशी योजना पहिल्यांदा घोषित झाली आहे. अशात देशाचं लक्ष सरकारवर आहे. योजनेबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रत्येक नसबंदीसाठी जवळपास 9800 डॉलर इतका खर्च आहे. सोबतच ही प्रक्रिया कठिण आहे. यात कर्मचाऱ्यांचा जीवही जाऊ शकतो.