इथे नद्यांमधील पाण्याचा रंग होत आहे केशरी, जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 01:34 PM2024-06-03T13:34:32+5:302024-06-03T13:35:08+5:30
रिसर्चनुसार, अमेरिकेच्या अलास्का राज्यातील नद्या आणि धबधब्यांचा रंग बदलत आहे. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, हे जलवायु परिवर्तनामुळे होत आहे.
जगभरातील वातावरण खूप बदलत चाललं आहे. जलवायु परिवर्तन आणि तापमान वाढीमुळे मनुष्य आणि प्राण्यांसोबतच आता नद्याही प्रभावित होत आहेत. भर उन्हाळ्यात पाऊस येत राहतो तर हिवाळ्यात उन्हाळ्यासारखं उन्ह असतं. नुकताच एक हैराण करणारा रिसर्च समोर आला आहे. नेचर अर्थ अॅंड एनवायरमेंट जर्नलमध्ये प्रकाशित हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. रिसर्चनुसार, अमेरिकेच्या अलास्का राज्यातील नद्या आणि धबधब्यांचा रंग बदलत आहे. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, हे जलवायु परिवर्तनामुळे होत आहे.
अनेक जागांवर रिसर्च
वैज्ञानिकांनी हा रिसर्च करण्यासाठी अलास्कामधील वेगवेगळ्या ७५ जागांची निवड केली. नॅशनल पार्क सर्विस, डेविसमध्ये कॅलिफोर्निया विश्वविद्यालय आणि अमेरिकन भूवैज्ञानिकांना या शोधादरम्यान आढळलं की, अलास्कामधील नद्या आणि धबधब्यातील पाण्याचा रंग बदलत आहे. या पाण्याचा रंग केशरी किंवा भगवा दिसत आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, असं पर्माफ्रॉस्टच्या वितळल्याने त्यातून निघणाऱ्या विषारी खनिजामुळे होत आहे.
जेव्हा पर्माफ्रॉस्ट वितळतात जेव्हा त्यात हजारो वर्षांपासून दबलेलं आयर्न, जस्त, कॉपर आणि शीसे बाहेर निघतात. यामुळेच अनेकदा पाण्याचा रंग बदलतो. अनेकदा यामुळे पाण्याचं रंग लालही होतो किंवा केशरी होतो. अलास्कातील जास्त पाणी केशरी रंगाचं झालं आहे. काही दिवसांआधी हवाईच्या एका आयलॅंडवरील तलावातील पाणी अचानक गुलाबी रंगाचं झालं होतं.
काय आहे पर्माफ्रॉस्ट?
पर्माफ्रॉस्ट म्हणजे जमिनीखाली जमा झालेला एक थर असतो ज्यात मातीसोबतच अनेक खनिज असतात. सामान्यपणे हा थर बर्फा गोठलेला असतो. पण वातावरणातील उष्णता वाढल्याने बर्फ वितळला तर पाण्यासोबत अनेक खनिज बाहेर येतात. हे खनिज पाण्यासोबत वाहून आजबाजूच्या नद्या, तलाव आणि धबधब्यांमध्ये जातात. ज्यामुळे त्यातील पाण्याचा रंग बदलतो.