याला म्हणतात नशीब! रातोरात 'तो' झाला करोडपती; लॉटरी लागताच केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 05:10 PM2023-09-17T17:10:28+5:302023-09-17T17:13:46+5:30
एका वृद्ध व्यक्तीचे 5 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त लॉटरी बक्षीस जिंकून नशीब फळफळले आहे.
नशीब बदलायला वेळ लागत नाही असं म्हणतात. असेच काहीसे अमेरिकेतील एका वृद्धासोबत घडले, ज्याला अचानक कोट्यवधींची लॉटरी लागली, ज्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यात, एका वृद्ध व्यक्तीचे 5 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त लॉटरी बक्षीस जिंकून नशीब फळफळले आहे. विशेष गोष्ट अशी आहे की त्या व्यक्तीने लॉटरी जिंकण्याच्या मोठ्या रकमेने पहिली जी गोष्ट खरेदी केली, त्याची सोशल मीडियावर अनेक दिवस चर्चा सुरू आहे.
असे सांगितले जात आहे की, व्यक्तीने लॉटरीमध्ये जिंकलेल्या पैशाने सर्वात आधी पत्नीसाठी टरबूज आणि फुले खरेदी केली. कोलोरॅडो लॉटरीने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 'मॉन्ट्रोसच्या 77 वर्षीय वाल्डेमर टॅस्चने 5,067,041 डॉलर म्हणजेच 42 कोटी रुपयांचा कोलोरॅडो लोट्टो प्लस जॅकपॉट जिंकला.
मिस्टर बड, जे सेवानिवृत्त आहेत, 6 सप्टेंबर 2023 च्या ड्रॉसाठी त्याचा नंबर निवडला गेला. ती एका ट्रीपवर गेले होते. तिथून परत आल्यावर त्यांनी वेबसाइटवर तिकीट तपासलं आणि जे पाहिलं ते पाहून धक्काच बसला. ही चूक असावी असे वाटले. जिंकलेल्या लॉटरीच्या पैशातून पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पत्नीसाठी टरबूज आणि फुले खरेदी केली.
मिस्टर बड आणि त्यांची पत्नी साधे जीवन जगतात. मिस्टर बड यांच्या पत्नीवर काही सर्जरी होणार आहेत. आता ते आनंदी आहेत कारण या पैशांमुळे त्यांना मदत मिळणार आहे. लॉटरीमुळे दिलासा मिळाला आहे. काही पैसे दान करण्याचा त्यांचा विचार आहे. लॉटरीमुळे त्यांचं कुटुंब खूप खूश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.