निळ्या रंगाचं का असतं पाण्याच्या बॉटलचं झाकण? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 11:19 AM2024-10-02T11:19:03+5:302024-10-02T11:24:08+5:30
Interesting Facts : पाण्याच्या वेगवेगळ्या बॉटलच्या झाकणांचा रंग वेगवेगळा का असतो? तुम्हाला कधीना कधी हा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर जाणून घेऊया.
Interesting Facts : घरात रहायचं असो वा बाहेर जायचं असो पाणी नेहमीच आपल्या सोबत असतं. बरेच लोक बाहेर गेले की, पिण्याच्या पाण्याची बॉटल खरेदी करतात. कारण जास्तवेळ पाण्याशिवाय राहणं अवघड असतं. तुम्हीही अनेकदा पाण्याची बॉटल खरेदी केली असेलच. पण कधी या गोष्टीचा विचार केलाय का की, पाण्याच्या वेगवेगळ्या बॉटलच्या झाकणांचा रंग वेगवेगळा का असतो? तुम्हाला कधीना कधी हा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर जाणून घेऊया.
मुळात वेगवेगळ्या पाण्याच्या बॉटलच्या झाकणांचा रंग वेगवेगळा असतो. कधी हे झाकणं निळ्या कधी, हिरव्या तर कधी पिवळ्या रंगाचं असतं. तर हे रंग बॉटलमधील पाण्याची क्वालिटीबाबत सांगत असतात.
निळ्या रंगाचं झाकण काय सांगतं?
रेल्वेने किंवा बसने प्रवास करत असताना बरेच लोक पाण्याची बॉटल खरेदी करतात. तुम्ही कधीना कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं असेल की, जास्तीत जास्त बॉटल्सचं झाकण हे निळ्या रंगाचं असतं. निळा रंग या गोष्टीचा संकेत देतं की, बॉटलमधील पाणी मिनरल वॉटर आहे किंवा थेट धबधबा, झरा किंवा नदीमधील आहे.
पांढऱ्या रंगाचं झाकण
पाण्याच्या बॉटलच्या रंगाचं आपलं एक वेगळं महत्वं असतं. पांढऱ्या रंगाचं झाकण आपल्याला सांगतं की, हे पाणी सामान्य पिण्याचं पाणी आहे. तर हिरवा रंग फ्लेवर्ड पाण्याचा संकेत देतं. त्याशिवाय काही कंपन्या त्यांच्या ब्रॅन्डची इमेज लक्षात ठेवून झाकणांचा रंग निवडतात.
झाकणाच्या रंगावरून जाणून घ्या पाण्याचा प्रकार
पाण्याच्या बॉटलच्या झाकणाचा रंग आपल्याला खूपकाही सांगत असतो. लाल रंगाचं झाकण स्पार्कलिंग किंवा कार्बोनेटेड पाण्याचा संकेत देतं. पिवळ्या रंगाचं झाकण पाण्यात व्हिटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट्स असल्याचा संकेत देतं. काळ्या रंगाचं झाकण सामान्यपणे प्रिमिअम किंवा अल्कलाइन पाण्याच्या बॉटलवर असतं. तर गुलाबी रंगाचं झाकण हे ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता करण्याच्या उद्देशाने असतं.