याला म्हणतात नशीब! बायको-मुलांच्या आठवणीत 'असं' काम केलं; रातोरात झाला 90 कोटींचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 11:54 AM2023-07-19T11:54:21+5:302023-07-19T11:56:29+5:30
एक-दोन कोटींचा मालक नाही तर तब्बल 90 कोटींचा मालक झाला आहे. त्या व्यक्तीने ही गोष्ट घरच्यांना सांगितल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला.
एक व्यक्ती कामानिमित्त पत्नी आणि मुलांपासून दूर राहत होता. याच दरम्यान, त्यांच्या आठवणीत त्याने असं काम केलं की तो रातोरात करोडपती झाला. तेही एक-दोन कोटींचा मालक नाही तर तब्बल 90 कोटींचा मालक झाला आहे. त्या व्यक्तीने ही गोष्ट घरच्यांना सांगितल्यावर त्यांना मोठा धक्काच बसला. व्यक्तीला देखील फार आनंद झाला. चीनमधील हांगझू शहरात ही घटना घडली आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, 30 वर्षीय व्यक्ती शहरापासून दूर काम करत असे. घरी येणे-जाणे कमी होते, त्यामुळे तो अनेकदा पत्नी आणि मुलांच्या जन्मतारखेनुसार लॉटरीची तिकिटे काढायचा. हे काम तो बरीच वर्षे करत होता. पण आता त्याचं नशीब बदललं आहे, कारण त्याला लॉटरी लागली आहे. 77 मिलियन युआन म्हणजे 90 कोटींहून अधिक लॉटरी जॅकपॉट जिंकला आहे.
व्यक्तीने या महिन्याच्या सुरुवातीला 30 युआन (सुमारे 300 रुपये) मध्ये 15 लॉटरीची तिकिटे खरेदी केली. प्रत्येक तिकिटावर त्याने पत्नी आणि तीन मुलांच्या जन्मतारीखांमधून काळजीपूर्वक निवडलेल्या क्रमांकांच्या ग्रुपवरच पैज लावली. लॉटरी प्राधिकरणाने 11 जुलै रोजी निकाल जाहीर केला तेव्हा 'वू' आडनाव असलेल्या व्यक्तीने लॉटरी जिंकली होती.
वू म्हणाला की माझ्या प्रत्येक लॉटरीच्या तिकिटाला 5.14 मिलियन युआनचे बक्षीस मिळाले आहे. लॉटरी क्रमांकांमध्ये माझी पत्नी आणि माझ्या मुलांची जन्मतारीख समाविष्ट आहे. मी या वर्षाच्या सुरुवातीपासून हे नंबर वापरत आहे. ते चांगली कामगिरी करेल अशी माझी भावना होती आणि ती खरी ठरली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.