बाबो! बेडवर झोपल्या झोपल्या वर्षाला कमवा २५ लाख रूपये, अजब नोकरीची सुवर्णसंधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 01:00 PM2021-10-18T13:00:08+5:302021-10-18T13:03:24+5:30
. नोकरीत कर्मचाऱ्याला केवळ बेडवर पडून टीव्ही बघायची आहे आणि झोपायचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, अशी काय ही नोकरी.
ब्रिटनमध्ये एका कंपनीत अशा नोकरीची ऑफऱ दिली जात आहे, जी आराम करणाऱ्या लोकांना जास्त आवडेल. ही कंपनी नोकरी ज्वॉइन करणाऱ्या लोकांना बेडवर पडून राहण्यासाठी पैसे देणार आहे. नोकरीत कर्मचाऱ्याला केवळ बेडवर पडून टीव्ही बघायची आहे आणि झोपायचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, अशी काय ही नोकरी. ज्यात लोकांना केवळ आराम करायचं काम असेल.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, ही नोकरी लक्झरी बेड कंपनी क्राफ्टेड बेड्स देत आहे. ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीला दररोज दिवसातील ६ ते ७ तास बेडवर पडून रहायचं आहे. क्राफ्टेड बेड्सकडून मॅट्रेस टेस्टर पदावर भरती केली जात आहे. ज्यांचं काम बेडवर झोपणं आणि बेड कसा वाटला याबाबत सांगणं हे असेल.
किती असेल पगार?
क्राफ्टेड बेड्स नोकरी करणाऱ्या व्यक्तीला वार्षिक २४ लाख ७९ हजार रूपये पगार देणार आहे. कर्मचाऱ्याला आठवड्यात रोज मॅट्रेस बेड टेस्ट करावे लागतील आणि कंपनीला सांगावं लागेल की, वापरण्यासाठी गादी कशी आहे. सोबतच यात काही सुधारणा हवी आहे का, काही कमतरता आहे का, रिव्ह्यू हेही सांगावं. लागेल. नोकरी करणाऱ्याला आठड्यातून ३७.५ तास म्हणजे दिवसातून साधारण ६ तास बेडवर पडून टीव्ही बघायची आहे.
रिपोर्ट्सनुसार, क्राफ्टेड बेड्सचे मार्केटिंग मॅनेजर ब्रायन डिलन यांनी सांगितलं की, या खास नोकरीसाठी कर्मचाऱ्याला ऑफिसला येण्याची अजिबात गरज नाही. टेस्टिंग आणि रिव्ह्यूसाठी गादी त्यांच्या घरी पाठवली जाईल. महत्वाची बाब म्हणजे ही नोकरी करण्यासाठी तुम्ही ब्रिटीश नागरिक असणं आवश्यक आहे.