50 किमी धावले तरच मिळणार बोनस, कंपनीची अजब ऑफर ऐकून कर्मचारी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 01:20 PM2023-12-19T13:20:58+5:302023-12-19T13:21:39+5:30

चीनच्या द डोंग्पो पेपर नावाच्या कंपनीने परफॉर्मेंस बोनससाठी कर्मचाऱ्यांचं काम नाहीतर त्यांचा फिटनेस गरजेचा ठरवला आहे.

Company sets up monthly bonus for staff must run at least 50 km to qualify | 50 किमी धावले तरच मिळणार बोनस, कंपनीची अजब ऑफर ऐकून कर्मचारी हैराण

50 किमी धावले तरच मिळणार बोनस, कंपनीची अजब ऑफर ऐकून कर्मचारी हैराण

नोकरी करणाऱ्या लोकांना हे चांगलंच माहीत आहे की, त्यांचा परफॉर्मेंस पाहूनच त्यांन बोनस दिला जातो. यासाठी सगळ्या कंपन्यांकडे आपली पॉलिसी असते. याच पॉलिसीनुसार कर्मचाऱ्यांचा बोनस ठरतो. अनेकवेळा यात काही बदलही होतात. चीनच्या एका कंपनीने आपली पॉलिसी अशी बदलली की, कर्मचारी हैराण झाले.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या द डोंग्पो पेपर नावाच्या कंपनीने परफॉर्मेंस बोनससाठी कर्मचाऱ्यांचं काम नाहीतर त्यांचा फिटनेस गरजेचा ठरवला आहे. जर कुणी कर्मचारी 50 किलोमीटर धावत असेल तर त्याला बोनस दिला जाईल. इतकं ऐकल्यावर काम सोडून आपला जास्त वेळ धावण्यावर देत आहेत.

महिन्यातून 50 किलोमीटर धावण्याचं टार्गेट

द डोंग्पो पेपर कंपनी चीनच्या गुआंगडॉन्ग प्रोविंसमध्ये आहे. कंपनीने नुकताच आपल्या बोनस पॉलिसीमध्ये बदल केला आहे. यानुसार कर्मचाऱ्यांना एक्सरसाइजच्या आधारावर बोनस दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना महिन्याचा बोनस तेव्हाच मिळेल जेव्हा ते महिन्यातून 50 किलोमीटर धावतील. 40 किलोमीटर धावण्यावर 60 टक्के, 30 किलोमीटरवर 30 टक्के बोनस मिळेल आणि जो महिन्यात 100 किलोमीटर धावेल त्याला 30 टक्के जास्त बोनस मिळेल.

या स्किममध्ये स्पीडवॉकिंग आणि माउंटेन हायकिंगलाही जोडण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांच्या फोनमधील अॅपमधून यावर लक्ष ठेवलं जाईल. जेव्हा ही पॉलिसी सोशल मीडियावर व्हायरल झाली. तेव्हा कंपनीच्या बॉसने सांगितलं की, ते या पॉलिसीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना फीट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्मचारीही यामुळे आनंदी आहेत. 

Web Title: Company sets up monthly bonus for staff must run at least 50 km to qualify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.