बोंबला! आता कपड्यांसारखी मनुष्यांनाही धुणार मशीन, आळशी लोकांसाठी परफेक्ट आविष्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 04:20 PM2024-11-30T16:20:52+5:302024-11-30T16:27:21+5:30
आता जपानच्या ओसाकामधील सायन्स को-ऑपरेशन एक अशी मशीन आणत आहे जी आळशी लोकांसाठी परफेक्ट असेल.
जसजशी वेळ बदलत आहे टेक्नॉलॉजी आपला आवाका वाढवत आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अशा अशा सोयी-सुविधा आणल्या जात आहे ज्यांची कधी कल्पनाही केली गेली नव्हती. ज्या कामांसाठी अनेक तास किंवा दिवस लागत होते ती कामे आता कमी वेळात पूर्ण होत आहेत. मशीनच्या माध्यमातून कामे सोपी झाली आहेत.
घरातील कामांसाठीही अनेक मशीन्स आल्या आहेत. कपडे धुण्यासाठीही मशीन उपलब्ध आहे. आता जपानच्या ओसाकामधील सायन्स को-ऑपरेशन एक अशी मशीन आणत आहे जी आळशी लोकांसाठी परफेक्ट असेल. ही मशीन मनुष्यांची आंघोळ करून देण्याचं काम करेल. वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल, पण हे सत्य आहे आणि लवकर ही मशीन लोकांना मिळणार आहे.
मनुष्यांना धुण्यासाठी मशीन
१९७० मध्ये ओसाका कंसाइ एक्स्पोमध्ये पॅनासोनिक होल्डिंग्स कॉर्पोरेशनकडून पहिल्यांदा कपडे धुण्याची मशीन लॉन्च करण्यात आली होती. आता याच देशात मनुष्यांची आंघोळ करून देणारी मशीन बनवली जात आहे. या कंपनीकडून “Mirai Ningen Sentakuki” नावाची मशीन बनवण्यात येत आहे. जी पहिली ह्यूमन वॉशिंग मशीन म्हटली जाईल. या कंपनीचे मुख्य आयोमा यांनी सांगितलं की, २०२५ मध्ये ओसाका कंसाइ एक्स्पोमध्ये मशीन लॉन्च केली जाईल.
या मशीन जी टेक्नॉलॉजी असेल ती कमाल असणार आहे. याद्वारे मोठे मोठे एअर बबल्स म्हणजे बुडबुड्यांच्या मदतीने अल्ट्रासाउंड क्रिएट केला जाईल. नंतर प्लास्टिक बॉल्सच्या मदतीने यूजरची मसाज होईल. हे बबल्स शरीर चांगल्या प्रकारे स्वच्छ करतील. सेंसर्सच्या माध्यमातून पल्स आणि बायोलॉजिकल डेटा कलेक्ट करून एआयच्या मदतीने योग्यपणे सर्व्हिस दिली जाईल. ही मशीन कॉकपिटच्या आकाराची असेल आणि यात गरम पाणी भरलेलं असेल. ही मशीन पहिल्यांदा १००० लोकांसाठी बनवली जाईल.