स्पर्धक वन्यजीव एकमेकांसह राहतात

By admin | Published: February 18, 2017 01:32 AM2017-02-18T01:32:20+5:302017-02-18T01:32:20+5:30

भारतीय वाघ, भारतीय चित्ता आणि भारतीय जंगली कुत्रे (ढोल) या तिन्ही मांसभक्षी प्राण्यांत वरवर बघता थेट स्पर्धा वा शत्रुत्व दिसते.

Competitor wildlife lives with each other | स्पर्धक वन्यजीव एकमेकांसह राहतात

स्पर्धक वन्यजीव एकमेकांसह राहतात

Next

लंडन : भारतीय वाघ, भारतीय चित्ता आणि भारतीय जंगली कुत्रे (ढोल) या तिन्ही मांसभक्षी प्राण्यांत वरवर बघता थेट स्पर्धा वा शत्रुत्व दिसते. परंतु नव्या अभ्यासात हे तिघेही एकमेकांशी अत्यंत कमी संघर्ष करत शेजारी राहात आहेत, असे आढळून आले आहे. सामान्यत: वाघ आणि जंगली मांसभक्षी जनावरे एकमेकांना टाळण्यासाठी वेगवेगळ््या ठिकाणी राहतात. पश्चिम घाट विभागातील तुलनेने छोट्याशा चार राखीव भागात वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीने केलेल्या संशोधनात हे परस्परांना टाळणारे वन्यजीव सांबर, हरीण, चितळ आणि डुक्कर यांच्या शिकारीसाठी एकमेकांशी स्पर्धा करीत असले तरी एकमेकांसोबत राहतात, असे आढळले आहे.
ज्या क्षेत्रात भक्ष्य मुबलक आहे त्या भागात अशियायी जंगली कुत्रे (ढोल्स) रात्री भटकणारे वाघ आणि चित्त्याच्या संपर्कात आले नाहीत. जंगली कुत्रे दिवसा सक्रिय असतात. मात्र कर्नाटकातील भद्रा राखीव जंगलात भक्ष्य खूपच कमी असून, अशा ठिकाणी ते भक्ष्याच्या शोधात एकाचवेळी निघतात, तेव्हा ढोल वाघांना टाळतात. कर्नाटकातील नागरहोल राष्ट्रीय पार्कमध्ये ही तिन्ही जनावेर आणि त्यांचे भक्ष्य विपुल प्रमाणात आहे. तेथे चित्ते वाघांना टाळतात. या तिन्ही मांसभक्षी प्राण्यांनी त्यांचे एकाच भक्ष्यावर लक्ष असले तरी एकमेकांसोबत राहण्याची सवय लावून घेतली आहे.

Web Title: Competitor wildlife lives with each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.