बिल द्यावं लागू नये म्हणून अंडरगारमेंट्समधून काढलेलं प्लास्टिक जेवणात टाकलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 05:01 PM2022-10-17T17:01:32+5:302022-10-17T17:03:29+5:30
या परिवाराने चार स्टार्टर सोबत काहीसाइड मील आणि ड्रिंक्ससहीत 6 मे कोर्स ऑर्डर केले होते. यानंतर पैसे द्यावे लागू म्हणून जी चलाखी केली ती CCTV मध्ये कैद झाली.
UK Crime News: अनेकदा हॉटेल्समधील अनेक किस्से समोर येत असतात. अशाच एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. यूकेतील एका महिलेने एका मोठ्या आणि हायफाय रेस्टॉरन्टमध्ये जाऊन भरपूर जेवण ऑर्डर केलं. पण बिल पाहिलं तर तिला धक्का बसला. अशात तिने पैसे वाचवण्यासाठी असं काही केलं ज्याचा कुणी विचारही केला नसेल.
'द मिरर' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, या रेस्टॉरन्ट ओनर नसीम खान या महिलेचा दावा आहे की एका महिलेने फ्री फूडसाठी अंडरगारमेंट्समध्ये ठेवलेल्या सिगारेटच्या पॅकेटचं प्लास्टिकचं रॅपर फाडलं आणि ते जेवणात टाकलं. नसीमने सांगितलं की, पाच लोकांचा परिवारा सोमावरी दुपारी बकिंघमशायरच्या मिल्टन कीन्स येथील करी हाउसमध्ये जेवायला आला होता. त्याचं बिल 16 हजार रूपये झालं होतं.
या परिवाराने चार स्टार्टर सोबत काही साइड मील आणि ड्रिंक्ससहीत 6 मे कोर्स ऑर्डर केले होते. यानंतर पैसे द्यावे लागू म्हणून जी चलाखी केली ती CCTV मध्ये कैद झाली. या प्रकरणात पोलिसांची एंट्री झाली होती. रेस्टॉरन्टच्या ओनरने सांगितलं की, ती फॅमिली तिथून गेल्यावर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला. त्यात दिसलं ते पाहून ती हैराण झाली.
ओनर म्हणाली की, 'मला माझ्या स्टाफवर विश्वास होता, त्यामुळे मला वाटलं की, मी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं पाहिजे. जेव्हा मी फुटेज चेक केलं तेव्हा ती महिला टॉपच्या आत घातलेल्या अंडरगारमेंट्सला ठीक करत होती. काही वेळाने ती वेटरला बोलवून त्याच्यावर रागावत होती. ती म्हणाली जेवणात प्लास्टिक आहे. वेटर म्हणाला असं प्लास्टिक किचनमध्ये वापरलंच जात नाही. नंतर महिला आणखी चिडली. दरम्यान महिलेचा पती म्हणाला की, जेवणाचा एक रूपयाही ते देणार नाहीत आणि ते रेस्टॉरन्टमधून निघून गेले.
रेस्टॉरन्टच्या ओनरने पोलिसात या परिवाराची तक्रार दाखल केली. पोलीस चौकशी करत आहेत.