कंडोम आणि बरंच काही...फ्लाइट अटेंडेंटने सांगितलं, प्रवाशी विमानात काय काय सोडून जातात!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 02:27 PM2024-02-05T14:27:06+5:302024-02-05T14:28:31+5:30
एका यूजरने विचारलं की, 'तुम्ही आतापर्यंत फ्लाइटमध्ये सगळ्यात विचित्र बाब काय बघितली?
विमानातील वेगवेगळ्या अजब गोष्टी समोर येत असतात. असाच एक अजब खुलासा आता झाला आहे. एका फ्लाइट अटेंडेंटने सांगितलं की, लोक विमानात काय काय सोडून जातात. ती 25 वर्षापासून अमेरिकेतील एका एअरलाईनसाठी फ्लाइट अटेंडेंट म्हणून काम करते. महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर Ask Me Anything ‘AMA’ सेशन केलं. रेडिटवर ‘Wnflyguy’ नावाच्या यूजरने ‘AMA’ कम्युनिटीवर लिहिलं की, मी अमेरिकेतील एका मुख्य एअरलाईन्समध्ये फ्लाइट अटेंडेंट आहे. मी 25 वर्षापासून काम करते. काहीही विचारू शकता.
एका यूजरने विचारलं की, 'तुम्ही आतापर्यंत फ्लाइटमध्ये सगळ्यात विचित्र बाब काय बघितली? यावर तिने उत्तर दिलं की, मी वापरले गेलेले कंडोम, घाणेरडे अंडरविअर महिला आणि पुरूष दोघांचेही, वापरलेले टेम्पॉन, आता केवळ काही गोष्टींचीच नावे सांगितली'. एका दुसऱ्या यूजरने विचारलं की, 'काय तुम्हाला सन्मान मिळाला, जेव्हा तुम्ही एखाद्या नशेत असलेल्या व्यक्तीला रोखलं किंवा एखाद्याची हरवलेली वस्तू परत केली तेव्हा'? यावर ती म्हणाली की, 'काही लोक माझ्यावर थुंकले आणि काहींनी माझ्यासोबत भांडण केलं'.
महिलेने हेही सांगितलं की, तिने अनेक लोकांना फ्लाइटमध्ये धुम्रपान करतानाही पाहिलं आहे. अशा प्रवाशांना पकडण्यासाठी पोलिसांना लॅंडिंगआधी सूचना दिली जाते. ही नोकरी करत असताना येणाऱ्या अडचणींबाबतही तिने सांगितलं. ती म्हणाली की, तुमचं तुमच्या जोडीदारासोबत नातं चांगलं असलं पाहिजे. तुम्ही इव्हेंट्सला किंवा सुट्टीवर जाऊ शकत नाही. पण हे सगळं यावर अवलंबून असतं की, स्थिती कशी आहे. जर परिवारात लहान मुले असतील तर विषय वेगळा असतो.