काँग्रेसच्या नेत्याचा विवाह सोहळा, नवरीनं थार ड्राइव्ह करत गाठलं सासर, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 05:06 PM2021-08-25T17:06:27+5:302021-08-25T17:08:24+5:30
Congress leader's wedding ceremony : हा विवाह सोहळा उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रंगल्याचे सांगण्यात येत आहे. हे नवदाम्पत्य काश्मीरमधील आहे. यामधील वराचा भाऊ जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे.
नवी दिल्ली - विवाह सोहळ्यांमध्ये वधूंची रॉयल एंट्री तुम्ही पाहिली असेल. मात्र आज एका वधूला देण्यात आलेला थाटामाटातील निरोप समोर आला आहे. या पाठवणीमध्ये ना अश्रू होते. ना दु:ख. उलट वधूचे नातेवाईक हसत हसत तिला निरोप देत होते. तर वधूही महिंद्रा थार गाडी चालवत सासरी रवाना झाली. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Congress leader's wedding ceremony, bride reaches father-in-law while driving Thar, VIDEO goes viral)
हा विवाह सोहळा उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रंगल्याचे सांगण्यात येत आहे. हे नवदाम्पत्य काश्मीरमधील आहे. यामधील वराचा भाऊ जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे. तर वर हा स्वत: काँग्रेसचा नेता आहे. या काँग्रेस नेत्याचा विवाहा काश्मीरमध्येच राहणाऱ्या तरुणीसोबत दोन दिवसांपूर्वी झाला होता. विवाहानंतर सासरी जाण्यासाठी या तरुणीने जरा हटके मार्ग निवडला. ही वधू महिंद्रा थारच्या ड्रायव्हिंग सिटवर बसली. तर वर तिच्या शेजारी बसला. त्यानंतर ही वधू स्वत: गाडी चालवत सासरला रवाना झाली. त्यानंतर सासरी गेटवर उभ्या असलेल्या सासरच्या मंडळींनी तिचे जोरदार स्वागत केले.
या वधूचे नाव सना वानी आहे, तर वराचे नाव शेअर अमीर आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शेख अमीर यांनी सांगितले की, सनाने मला गाडी चालवण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर मी तिच्याकडे गाडीचे स्टिअरिंग सोपवले. हे सारे काही अचानक घडले. पण आमचा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल, असे आम्हाला वाटले नव्हते.
A bride driving herself with the groom to her in-laws. #KhudkafeelKashmirpic.twitter.com/lwRRy4QRw5
— Ahmed Ali Fayyaz (@ahmedalifayyaz) August 24, 2021
दरम्यान, सना हिने सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून गाडी चालवते. मला माझ्या वडिलांनी गाडी चालवायला शिकवले होते. महिला गाडी चालवू शकतात, असे अनेक पुरुषांना वाटते. माझ्या विवाहादिवशीही अनेकांना असेच वाटत होते. मात्र मी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. अनेकजण टीका करत आहेत. मात्र मला त्याची चिंता नाही.