बोंबला! बुरका घालून फ्लाइटमध्ये शिरला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आणि घरीही पोहोचला...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 07:42 PM2021-07-20T19:42:29+5:302021-07-20T19:44:23+5:30
ही घटना इंडोनेशियाच्या जकार्तामधील आहे. भारतानंतर आता इंडोनेशियामध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे.
कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसलेल्या इंडोनेशियामध्ये एक व्यक्ती घरी परण्यासाठी इतका आतुर होता की, तो बुरका घालून फ्लाइटमध्ये चढला. तो जवळपास सर्वच लोकांना फसवून आपल्या शहरात पोहोचला. पण एका छोट्याशा चुकीमुळे त्याचा भांडाफोड झाला.
ही घटना इंडोनेशियाच्या जकार्तामधील आहे. भारतानंतर आता इंडोनेशियामध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, या व्यक्तीने आपल्या पत्नीचा बुरका घातला कारण त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. ही व्यक्ती आपला रिपोर्ट दाखवून जकार्ता एअरपोर्टवर सिक्युरिटी आणि हेल्थ अधिकाऱ्यांना चकमा देऊन पुढे गेला होता आणि फ्लाइटमध्ये जाऊन बसला.
सीएनन इंडोनेशियानुसार, जेव्हा ही व्यक्ती फ्लाइटमध्ये चेंज करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा त्याची पोलखोल झाली. हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला आणि त्याल अॅम्बुलन्सने ट्रान्सपोर्ट करण्यात आलं. आता तो त्याच्या होमटाऊनमध्ये घरात क्वारंटाइन आहे.
नॉर्थ मालुकु पोलीस फोर्सचे पोलीस चीफ कमिश्नर अदीप रोजीकेन म्हणाले की, ही व्यक्ती घरी पोहोचल्यावर होम आयसोलेट होणार आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह झाल्यावर त्याची कसून चौकशी केली जाईल.
कोरोनामुळे गेल्या काही दिवसात या देशात रोज हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. येथील मृतांची आकडेवारी भारत आणि ब्राझीलपेक्षाही जास्त आहे. इंडोनेशियात आतापर्यंत ७० हजारांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला आहे.