Corona virus :सोईसुविधांअभावी कोरोनापासून बचावासाठी आदिवासीयांनी 'असे' तयार केले मास्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 05:38 PM2020-03-25T17:38:44+5:302020-03-25T18:20:41+5:30
छत्तीसगडमधील आदिवासीबहूल असलेल्या एका जिल्याह्यात कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रहिवासीयांनी वेगळीच शक्क्ल लढवली आहे.
जगभरातसह भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मास्क आणि सॅनिटायजर्स वापरण्याचा सल्ला विविध माध्यमातून दिला आहे. यामुळे सगळेचजण मास्कचा वापर करत आहेत. पण भारतातील काही ठिकाणं आजही अशी आहेत. जिथे जीवनावश्यक वस्तू सुद्धा गरजेला उपलब्ध होत नाहीत. अशावेळी व्हायरसपासून बचाव करण्याासाठी त्याभागातील लोक आपापल्या परिने प्रयत्न करत असतात.
छत्तीसगडमधील आदिवासीबहूल असलेल्या एका जिल्याह्यात कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रहिवासीयांनी वेगळीच शक्क्ल लढवली आहे. या जिल्ह्यातील आदिवासींनी कोरोना व्हायरसं संक्रमण होऊ नये म्हणून झाडांच्या पानांपासून मास्क तयार केला आहे.
आमाबेडा परिसरातील भर्रिटोला गावातील आदिवसीयांनी निसर्गात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीपासून मास्क तयार केले आहेत. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून पानांनी तयार केलेले मास्क वापरत आहेत. तसंच घरातून बाहेर न पडण्याचे सुद्धा या आदिवासींनी ठरवलं आहे.
@narendramodi@PMOIndia बस्तर के आदिवासी #coronavirusindia से लड़ने देसी मास्क बना रहे हैं, घर से बाहर कम ही निकल रहे हैं @ndtvindia@ndtv@drharshvardhan@bhupeshbaghel@drramansingh@ChouhanShivraj@MoHFW_INDIA@HemantSorenJMM@hridayeshjoshi#21daylockdown#IndiaFightsCoronapic.twitter.com/Gw6jeTnMoj
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) March 25, 2020
त्यांचं असं म्हणणं आहे की या गावात मास्क उपलब्ध होणं कठीण आहे. म्हणून स्वतःच मास्क तयार करून विश्वास देण्याचं काम हे गावकरी करत आहेत. काही दिवसांपूर्वी एक व्यक्तीने सोशल मीडियावर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेलकडून काही वस्तूंची मागणी केली होती, ज्यामुळे सगळ्या लोकांना आवश्यक वस्तू उपलब्ध व्हायला हव्यात. परंतू या मागणीला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसून आला नाही.