बोंबला! 'कोरोना व्हायरस तुमच्या पत्नीसारखा', मंत्र्याच्या वादग्रस्त विधानावरून सोशल मीडियात गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:18 PM2020-05-30T12:18:31+5:302020-05-30T12:18:38+5:30
एका मंत्र्याने केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका होता आहे.
इंडोनेशियातील एका मंत्र्याने कोरोना व्हायरसबाबत एक वादग्रस्त विधान केलंय. त्यांनी कोरोना व्हायरसला बंडखोर पत्नीची उपमा दिली आहे. असे सांगितले जात आहे की, त्यांनी असं विधान लोकांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती दूर करण्यासाठी केलंय. पण आता त्यांच्या या विधानावर जोरदार टीका होत आहे.
इंडोनेशियातील एका महिला समूहाने आणि सोशल मीडिया यूजर्सकडून इंडोनेशियातील संरक्षण मंत्री महमूद एमडी यांच्या विधानाची खिल्ली उडवली जात आहे. या मंत्र्याने एका युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन संबोधित करताना हे विधान कलं.
इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री महमूद महफूद एमडी हे म्हणाले होते की, आपण नेहमीसाठी याचा सामना करावा लागणार आहे. आपल्याला या परिस्थितीशी जुळवून घेऊन आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
त्यानंतर ते म्हणाले की, माझ्या एका सहकाऱ्याने याबाबत एक गमतीदार वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, कोरोना आपल्या पत्नीसारखा आहे. सुरूवातीला तुम्ही याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करता. त्यानंतर तुम्हाला याची जाणीव होते की, असं होऊ शकत नाही. मग तुम्ही त्याच्यासोबत जीवन जगणं शिकता.
टीका करणारे लोक या वक्तव्याला सेक्सिएस्ट रिमार्क करत आहेत. एका रिपोर्टनुसार, येथील महिल्यांच्या एका ग्रुपच्या मुख्य डिंडा निसा म्हणाल्या की, अशाप्रकारचं वक्तव्य कोरोना व्हायरसला आळा घालण्यात सरकार कसं निकामी ठरलंय हे दाखवतं. तसेच आपल्या सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकताही दाखवतं.
इंडोनेशियामध्येही कोरोनाने चांगलंच थैमान घातलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार ने घेतलेल्या सोशल डिस्टंसिंगच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 3 लाख 40 हजार सैनिक तैनात केले आहेत.
इंडोनेशियात आतापर्यंत 24 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1, 496 लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. इंडोनेशियात फार कमी लोकांच्या टेस्ट झाल्या. त्यामुळे संक्रमण झालेल्यांचा आकडा फार जास्त असू शकतो असाही दावा केला जात आहे.