CoronaVirus : 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूसाठी केलं होतं लॉकडाऊन, तरी असा झाला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 03:52 PM2020-03-30T15:52:35+5:302020-03-30T15:59:44+5:30

रिसर्चकर्त्यांच्यामते मृत्यू  झालेल्यांची संख्या लॉकडाऊन असलेल्या शहरात कमी होती. 

CoronaVirus : 100 years ago Lockdown was done for the Spanish flu myb | CoronaVirus : 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूसाठी केलं होतं लॉकडाऊन, तरी असा झाला परिणाम

CoronaVirus : 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूसाठी केलं होतं लॉकडाऊन, तरी असा झाला परिणाम

googlenewsNext

सध्या कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे.  संपूर्ण जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतातसुद्धा २१  दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. १०० वर्षांआधी कोरोनाप्रमाणेच स्पॅनिश फ्लूचा कहर माजला होता. त्यावेळचा लॉकडाऊन महत्वपूर्ण सिद्ध झाला होता. रिसर्चकर्त्यांच्यामते मृत्यू  झालेल्यांची संख्या लॉकडाऊन असलेल्या शहरात कमी होती. 

अमेरिकेतील लॉयोला विद्याविद्यापीठातील रिसर्चकर्त्यांनी दावा केला आहे की १९१८ ते १९ या काळात स्पॅनिश फ्लूची महामारी पसरली होती. त्यावेळी लॉकडाऊनसारखा मोठा निर्णय घेण्यात आला होता. ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त क्वारंटीन होते.  त्याठिकाणचा मुत्यू दर कमी होता.  

स्पॅनिश फ्लूच्या महामारीमुळे जगातील जवळपास  एक तृतियांश  लोकसंख्या प्रभावित झाली  होती.  कोट्यावधी लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. त्यावेळी शाळा बंद करणं, जमावबंदी, मास्कचा वापर, साफ-सफाई असे वेगवेगळे उपाय या आजाराला रोखण्यासाठी यशस्वी ठरले होते. 

अमेरिकन सोसाइटी ऑफ साइटोपॅथोलॉजीच्यामते अमेरिकेतील शहरांमध्ये सन फ्रांन्सिस्को, सेंट लुईस आणि मिलवाकी, कंकास मध्ये मृत्यूदर ३० ते ५० टक्क्यांनी कमी होता. ज्या शहरांमध्ये उशीरा लॉकडाऊन करण्यात आलं होतं. अशा शहरांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले होते. ( हे पण वाचा- 66 वर्षांपासून रहस्य बनून आहे 'काल्पनिक' देशातून आलेली 'ही' व्यक्ती, अचानक झाली होती गायब!)

त्यावेळी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे  लोकांना असं वाटत होतं की सरकारचा निर्णय योग्य नाही. अमेरिकेत स्पॅनिश फ्लूमुळे ६.७५ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. पैम्बुसिन यांच्यामते १९१८ मध्ये महायुध्द चालू होते. त्यामुळे अमेरिकेला गरीबी, कुपोषण यांचा सामना करावा लागत होता. वैद्यकिय सेवा सुद्धा फारश्या प्रभावित नव्ह्त्या. पण त्यावेळच्या तुलनेत सध्याच्या परिस्थितीत अनेक बदल झालेले आहेत. १९१८-१९ च्या महामारीच्यावेळी उचललेली पाऊलं लक्षात घेऊन कृती केल्यास कोरोना व्हायरस सारख्या मोठ्या आजाराला नियंत्रणात करता येईल. ( हे पण वाचा-CoronaVirus: कोरोनाच काय, 'या' गावात पोहोचला नाही कुठलाच साथीचा आजार; कारण वाचून चकीत व्हाल)

Web Title: CoronaVirus : 100 years ago Lockdown was done for the Spanish flu myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.