CoronaVirus : कौतुकास्पद! ९ वर्षीय मुलीने कोरोनाग्रस्तांना 'अशी' केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:43 PM2020-04-08T17:43:04+5:302020-04-08T18:29:07+5:30
सरकारच्या या मदतीला एका चिमुरडीने प्रतिसाद देत कोरोनाग्रस्तांसाठी मदत केली आहे.
कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरासह भारतात सुद्धा झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लोकांना सर्व- सोयी सुविधा पुरवण्यासाठी आणि समाजातील गोरगरीब जनतेची मदत करण्यासाठी सरकारने आवाहन केलं होतं. सरकारच्या या मदतीला एका चिमुरडीने प्रतिसाद देत कोरोनाग्रस्तांसाठी मदत केली आहे.
ही चिमुरडी भोपाळची रहिवासी आहे. ९ वर्षीय मुलीने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला प्रसिताद देत मदतीचा हात पुढे केला आहे. या मुलीचे नाव चाहत कुकरेजा असं आहे. ही मुलगी इयत्ता तिसरी शिकते. पण या वयात सुद्धा या मुलीने समाजासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.
चाहतला वृत्तपत्र वाचत असाताना ही एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान निधीच्यामार्फत मदत केली जात आहे. हे पाहून चाहतने लगेचंच आपले पैसे वाचवून ठेवलेलं भांड आपटलं आणि त्यातून पैसै काढून आपले वडिल राजेश कुकरेजा यांना दिले. चाहतचा हा पैश्यांचं भांडं फोडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत ने ९८५ रुपयांची मदत दिली आहे. सोशल मीडियावर चाहतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.